मडुरा नाबर प्रशालेमध्ये
बक्षीस वितरण सोहळा

मडुरा नाबर प्रशालेमध्ये बक्षीस वितरण सोहळा

87115
मडुरा ः पारितोषिक वितरण सोहळ्याचे उद्‍घाटन करताना मंगेश कामत. शेजारी भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, प्रतीक्षा शिरोडकर आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मडुरा नाबर प्रशालेमध्ये
बक्षीस वितरण सोहळा
बांदा ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. व्यासपीठावर बांदा नाबर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उद्योजक शंकर वळंजू, नारायण पित्रे, भिकाजी धुरी, घनःश्याम वालावलकर, हेलेन रोड्रिक्स, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी केले. यावेळी वर्षभरात प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रिक्स, तेजस्वी गावडे, प्राची परब उपस्थित होते. रॉड्रिग्ज यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्वी गावडे यांनी आभार मानले.
...............
87113
मठ ः आर्यन आईर याचे अभिनंदन करताना शिक्षक व विद्यार्थी.

आर्यन आईरला कौशल्य पुरस्कार
बांदा ः गौरी संगीत विद्यालय, वडाळा आयोजित राज्यस्तरीय पखवाज, तबला सोलो वादन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठ क्रमांक २ चा सहावीतील विद्यार्थी आर्यन आईर याला विशेष कौशल्य पुरस्काराने गौरविण्यात आले. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने श्री गिरोबा प्रासादिक भजन मंडळ, मठ व बुवा सुधीर आईर यांनी पुढाकार घेत आर्यनला संगीत क्षेत्रात पुढे नेण्याचे काम केले. त्याच्यातील कौशल्य आज आम्ही राजस्तरावर नेऊ शकलो, असे सांगत बुवा आईर यांनी आर्यनचे कौतुक केले. या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पाडलोस येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब आदींसह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com