शेर्ले नदीपर्यंत बस नसल्याने हाल

शेर्ले नदीपर्यंत बस नसल्याने हाल

8711
कणकवली ः विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांना निवेदन देताना विजय शेर्लेकर. शेजारी जिल्हा वाहतूक पर्यवेक्षक भगवान धुरी, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, पत्रकार रामदास जाधव आदी.


शेर्ले नदीपर्यंत बस नसल्याने हाल

‘वंचित’ची खंत; शिरोडा-बांदाप्रश्नी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः शेर्ले तेरेखोल नदीपर्यंत जाणारी शिरोड-बांदा बसफेरी गेली काही वर्षे नदीपर्यंत नेण्याचे बंद केल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षक प्रमोद यादव यांची भेट घेत बस तातडीने बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. या बसफेरीसह सातार्डा बस फेऱ्याही दोन दिवसांत शेर्ले नदीपर्यंत पूर्ववत जाणार असल्याचे सांगून तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन यादव यांनी दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, शेर्ले जुन्या कापई पुलावरील वाहतूक बंद झाल्यापासून शिरोडा-बांदा या बसफेऱ्या शेर्ले पावसकर दुकान ते शेर्ले नदीपर्यंत नेण्याचे बंद करण्यात आले. याचा फटका गेली कित्येक वर्षे या भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशी वर्गाला बसत आहे. परिवहन विभागाने ही समस्या लक्षात घेत शिरोडा-बांदा बसफेऱ्यांसह पाडलोस, सातार्डा व सातोसे या फेऱ्याही शेर्ले पावसकर दुकान ते नदीपर्यंत जातील असी ग्वाही दिली. तसेच सावंतवाडी व वेंगुर्ले आगार प्रमुखांना तसे आदेशही दिले. संबंधित आगार प्रमुखांनी येत्या दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीने परिवहन विभागाचे आभार मानले. निवेदन देताना जिल्हा वाहतूक पर्यवेक्षक भगवान धुरी, वाहतूक निरीक्षक विशाल देसाई, पत्रकार रामदास जाधव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com