फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचा कार्यकर्त्याना कानमंत्र

फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचा कार्यकर्त्याना कानमंत्र

फोटो rat5p24 ओळी : KOP23L87097
खेड ः ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची खेड येथील उद्योजक दयानंद कासारे यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांच्या मातोश्री सौ.सिमा कासारे यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत कासारे कुटूंबीय


सुषमा अंधारेंचा कार्यकर्त्याना कानमंत्र


खेड, ता. ५: शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रभर दौरे करून खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आधार देणाऱ्या शिवसेना उपनेत्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी त्यांचे खेड येथील हितचिंतक उद्योजक दयानंद कासारे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी खेड येथील शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
पक्ष बळकटीसाठी आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आपण एकीची वज्रमूठ घट्ट आवळली पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आजारपणात या गद्दारांनी त्रास दिला असून या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी खेड येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेनी संध्याकाळी व्यासपीठावरून शिवसैनिकांना संबोधित केले.
भाजप वेगवेगळ्या एजन्सीजना मागे लावून आपल्या पदाधिकारी, आमदार, खासदार यांना चितपट करण्यासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत. पण यावर मात करून आपल्याला यापुढे आपल्या पक्षाचे आणि पक्षप्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी साऱ्या शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. आजची सभा ही २०२४ची विजयी सभा आहे. या ठिकाणी माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेश असून यापुढे दापोली खेड मंडणगड या मतदारसंघाचे भावी आमदार हे संजय भाऊ असतील असा आशावाद श्रीमती सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी रमेश कासारे, सौ. सिमा कासारे यांच्यासह कासारे कुटुंबीय उपस्थित होते.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com