जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी

जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी

rat५p३०.jpg फोटो येणार आहे

खेड : सभेच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात शहरात माजी आमदार कदम यांनी सम्राट अशोकनगर येथील उद्योजक दयानंद कासारे यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

संजय कदम यांची
शहरात जणू पदयात्रा
---
जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी
खेड, ता. ५ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येथील जाहीर सभा ही लक्षवेधी होणार आहे, यात शंकाच नाही. परंतु, गेले महिनाभर या सभेची तयारी सुरू असून, खेड- दापोली- मंडणगडसह रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात मग्न होते. सभेच्या पार्श्वभूमीवर सकाळी माजी आमदार संजय कदम यांनी शहरातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. सभा लक्षवेधी ठरण्याच्या उद्देशाने आमदार कदम यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. शहरातील संपूर्ण वातावरण भगवेमय झालेले आहे. आजची सभा ही २०२४ विधानसभेची विजय सभा म्हणून आमदार कदम यांनी घोषित केलेली आहे. आज सकाळपासून शहर परिसरात त्यांनी त्यांच्या जुन्या आणि निष्ठावंत अनेक कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी देऊन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ठाकरे कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणवासीयांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन या वेळी माजी आमदार कदम यांनी केले. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com