मुणगे भगवती मंदिरात आजपासून शिमगोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगे भगवती मंदिरात
आजपासून शिमगोत्सव
मुणगे भगवती मंदिरात आजपासून शिमगोत्सव

मुणगे भगवती मंदिरात आजपासून शिमगोत्सव

sakal_logo
By

मुणगे भगवती मंदिरात
आजपासून शिमगोत्सव
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ५ ः येथील भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
मुणगे भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सवाला होळी उत्सवाने सुरुवात होणार आहे. उद्या (ता. ६) दुपारी २.३० वाजता बांबरवाडी येथे पोपळीच्या झाडाची होळी आणण्यासाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच बारापाच मानकरी, ग्रामस्थ, जाणार असून तेथून ढोलताशांच्या गजरात होळी भगवती मंदिर येथे येणार आहे. त्यानंतर होळीस आंब्याची पाने बांधली जाणार आहेत. सायंकाळी वाजतगाजत होळी उभारण्यात येणार आहे. गुरव यांच्याकडून होळीची विधीवत पूजा झाल्यानंतर आकार ठेवणे, नैवेद्य, गावघराचे गाऱ्हाणे, नारळ ठेवणे, गावकरांमार्फत गाऱ्हाणे घालून शिमगोत्सवाची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी (ता. ७) रात्री भगवती मंदिर व होळीजवळ पारंपरिक पद्धतीने कारिवणेवाडी, बांबरवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी या मंडळांची रोंबाट खेळ व नाचगाणी, होळीजवळ कवळ पेटविणे, भगवती मंदिरात बांबरवाडी मंडळाचा तमाशा, तिसऱ्या (ता. ८) गावांमध्ये खेळे खेळण्यास सुरुवात होईल. चौथ्या दिवशी (ता. ९) रात्री होळीजवळ व भगवती मंदिरात रोंबाट खेळ व नाचगाणी, पाचव्या दिवशी (ता. १०) दुपारी भगवती मंदिरात बांबरवाडी यांचा तमाशा, सर्व मंडळांची पारंपरिक रोंबाट खेळ, होळीजवळ रोंबाट, नवसफेड व नवीन नवस गाऱ्हाणी, भगवती मंदिरात रोंबाट, देवीच्या सभा मंडपात नाचगाणी, देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. गावामध्ये नवीन जोडप्याने होळीजवळ पाच नारळाचे तोरण व गुळ देण्याची प्रथा आहे.