कणकवली :रेल्वे गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :रेल्वे गाड्या
कणकवली :रेल्वे गाड्या

कणकवली :रेल्वे गाड्या

sakal_logo
By

होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या
कणकवली, ता. ५ ः कोकण रेल्वे मार्गावर होळी उत्सवासाठी जादा गाड्या धावणार आहेत. मुंबई ते रत्नागिरी, पनवेल ते रत्नागिरी, पनवेल ते सावंतवाडी आणि एलटीटी ते रत्नागिरी या मार्गावर जागा रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.
गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी स्पेशल मुंबई सीएसएमटी येथून ४ आणि ७ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०११५२ रत्नागिरी ते मुंबई सीएसएमटी स्पेशल रत्नागिरी येथून ६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबेल. गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी ते पनवेल स्पेशल रत्नागिरी येथून ४ आणि ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०११५३ पनवेल ते रत्नागिरी स्पेशल पनवेल येथून ५ आणि ८ मार्च रोजी सायंकाळी ६.२० वाजता सुटेल. ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.
गाडी क्र. ०११५५ पनवेल ते सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून ४ आणि ७ मार्च रोजी सायंकाळी ६.२० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०११५६ सावंतवाडी रोड ते पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून ५ आणि ८ मार्च रोजी सकाळी ७.४५ वाजता सुटेल. ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. गाडी क्र. ०११५८ रत्नागिरी - एलटीटी विशेष गाडी रत्नागिरी येथून ९ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता सुटेल. ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.