आडाळी-मोरगाव रस्त्यासाठी प्रसंगी रास्तारोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडाळी-मोरगाव रस्त्यासाठी
प्रसंगी रास्तारोको आंदोलन
आडाळी-मोरगाव रस्त्यासाठी प्रसंगी रास्तारोको आंदोलन

आडाळी-मोरगाव रस्त्यासाठी प्रसंगी रास्तारोको आंदोलन

sakal_logo
By

आडाळी-मोरगाव रस्त्यासाठी
प्रसंगी रास्तारोको आंदोलन

पराग गावकर ः ‘बांधकाम’ला इशारा

कळणे, ता. ५ : आडाळी ते मोरगाव दरम्यानच्या बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आडाळीत कार्पेटचे काम करू देणार नाही, असा इशारा सरपंच पराग गावकर यांनी बांधकाम विभागाला दिला.
बांदा-दोडामार्ग रस्त्याची गेल्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली; मात्र आडाळी चर्च ते मोरगाव बस स्टॉपपर्यंतचा रस्ता गेले वर्षभर खड्ड्यात आहे. पावसाळ्यात वारंवार मागणी केल्यानंतर जांभ्या दगडांनी खड्डे भरण्यात आले; मात्र येथील खडीचा पृष्ठभाग पूर्णतः उखडून गेल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नाही. मंदिरासमोरील कार्पेटचे काम रोखल्यानंतर कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी रखडलेली दुरुस्ती आठवड्यात करण्यात येईल, असे आश्वासन दिले; मात्र अद्यापही काम झालेले नाही. आता आडाळी-कोसमवाडी घाटीतील रस्त्याचे कार्पेट करण्यासाठी ठेकेदाराने यंत्र सामुग्री आणली आहे. त्यामुळे सरपंच गावकर यांनी आज बांधकामच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून कार्पेटचे काम रोखण्याचा इशारा दिला. जोपर्यंत आडाळी ते मोरगाव दरम्यानचा रस्ता सुस्थितीत आणला जात नाही, तोपर्यंत आडाळीत अन्य काम करू देणार नाही. प्रसंगी रस्तारोको करू, असा इशाराही त्यांनी दिला.