योगेश कदमचा आम्ही दापोलीत पराभव करु

योगेश कदमचा आम्ही दापोलीत पराभव करु

दापोलीत योगेश कदमचा आम्ही पराभव करु
अनंत गीते ; कदम कुटूंबीय लढण्याची हिम्मत करणार नाहीत
खेड, ता. ५ ः येथील गोळीबार मैदानावर लोकशाही वाचवण्याचे पहिले रणशिंगे उध्दव बाळासाहेब ठाकरे हे फुंकत आहेत. येणार्‍या विधानसभेला दापोली मतदारसंघातून योगेश कदमचा आम्ही असा पराभव करु की रामदास कदम कुटूंबीय निवडणुक लढविण्याची हिम्मत करु शकणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेनेेचे नेते माजी खासदार अनंत गिते यांनी केले.
खेड येथील गोळीबार मैदानावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गोळीबार मैदानावर आतापर्यंत विराट जाहीर सभा एकदाच झाली होती. त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांची सभा होत आहे. मैदाने, रस्ते पुर्णतः भरलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासातील ही विराट सभा आहे. या ठिकाणाहुनच नवी लढाई सुरु होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. या गोळीबार मैदानावर लोकशाही वाचवण्याचे पहिले रणशिंगे येथे फुंकणार आहेत. येणार विधानसभेला दापोली मतदारसंघातून योगेश कदमचा आम्ही असा पराभव करु की रामदास कदम कुटूंबीय निवडणुक लढविण्याची हिम्मत करु शकणार नाही.
तत्पुर्वी आमदार भास्कर जाधव म्हणाले, जिल्ह्याला ८५० कोटींपैकी एक रुपयाची सुध्दा प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेली नाही. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या विकासकामांना मान्यता मिळाली होती, बजेटमध्ये तरतुद केली होती. जिल्ह्याचा नियोजनचा आराखडा २४४ कोटीपर्यंत नेला. विक्रांत जाधव जिल्हा परिषद अध्यक्ष असताना पाणी योजनांसाठी ७०० कोटी रुपयांची मिळाले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५७ रुग्णवाहिका दिल्या, हे विसरुन चालणार नाही. सिधुरत्न योजना, रस्त्यासाठी निधी हे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मिळाले आहे. कोरोनासारखे संकट आले तेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काम करत होते. तरीही त्यांच्यावर आरोप झाले. या आरोप करणार्‍या योगेश कदम यांना पराभुत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संजय कदम शिवसेनेत आले तरीही राष्ट्रवादीने नाराज होऊ नये. गद्दारी संपवायचे हेच आपले सर्वांचे ध्येय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com