मडुऱ्यात विद्युतभारीत वाहिनी कोसळली

मडुऱ्यात विद्युतभारीत वाहिनी कोसळली

87177
मडुरा ः येथे तुटून पडलेली वीज वाहिनी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

विद्युतभारीत वाहिनी कोसळली

मडुऱ्यातील घटना; शेतकरी बचावला, महावितरणच्या कारभारबाबत संताप


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः मडुरा-डिगवाडी जवळील काजू बागेत काजू गोळा करताना अचानक विद्युतभारित वाहिनी काजूच्या झाडावर कोसळली. अवघ्या चार फुटाच्या अंतरावर पडल्याने सुदैवाने शेतकरी बचावला.
काजू बागायतदार शेतकरी उत्तम वालकर हे आपल्या काजू बागेत दुपारी काजू गोळा करत होते. त्याच दरम्यान अचानक खांबावरील लोखंडी कॅप तुटून विद्युत भारीत वाहिनी काजूच्या फांदीवर पडली. वाहिनी अंगावर येणार हे लक्षात येताच प्रसंगवधान राखत त्यांनी जीव वाचवण्यात यश मिळविले. याची कल्पना वायरमन यांना दिल्याचे वालालकर यांनी सांगितले. महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा बळी जाऊ शकतो, असे सांगत श्री. वालकर यांनी महावितरणवर रोष व्यक्त केला. दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे जीवास धोका आहे. त्यामुळे काजू गोळा करण्यास जावे की घरी बसावे याचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावे. एकंदरीत सर्व महावितरण व्यवस्था सुधारण्यासाठी २० मार्चला मडुरा महसूल मंडळ कार्यालयासमोर सहकाऱ्यांसोबत उपोषणास बसणार असल्याचा इशारा वालावलकर यांनी दिला.
--
२० मार्चला आंदोलन करणार
दरम्यान, महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसून जीव गमवावा लागला असता. वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे २० मार्चला मडुरा महसूल मंडळ अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा काजू बागायतदार शेतकरी प्रकाश वालकर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com