गणवेश वितरणास हिरवा कंदील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणवेश वितरणास हिरवा कंदील
गणवेश वितरणास हिरवा कंदील

गणवेश वितरणास हिरवा कंदील

sakal_logo
By

87180
मुंबई ः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाने भेट घेतली.

गणवेश वितरणास हिरवा कंदील

प्राथमिक शिक्षक संघाने मानले शिक्षणमंत्र्यांचे आभार

तळेरे, ता. ५ ः जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांना गणवेश द्यावेत, अशी मागणी वेळोवेळी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली होती. अनेक वर्षांपासून होत असलेल्या या मागणीचा प्रश्न शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी निकाली काढल्यामुळे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने आभार मानले.
शाळेतील गणवेशाची ही समस्या सोडविण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करून द्यावी व सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत, यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे वेळोवेळी शासनस्तरावर प्रयत्न केला होता. संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वात तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. याचा सकारात्मक विचार शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला. शासनाकडून २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात येईल व गणवेशासाठी आर्थिक तरतुद अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने जिल्हा परिषदेला वितरीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याची घोषणा मुंबई येथे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात सर्व राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या उपस्थित केली आहे. अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीचा प्रश्न जाहीर केल्यामुळे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेतर्फे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे व राज्य पदाधिकारी-अनंता जाधव, माधव वायचाळ, तुळशीराम आचणे, संभाजी ठुंबे, विजयकुमार देसले, दिलीप केने, बळीराम चापले, जगन्नाथ पोटे, गोवर्धन मुंदडा, बालाजी जबडे, सुनिल गुरव, आबासाहेब बच्चाव, पाकिजा पटेल, गजानन गायकवाड, प्राजक्ता रणदिवे, सतिश चिपरीकर, गजानन देशमुख, शिवशरण रटकलकर, परसराम हेंबाडे, रमेश मुनेश्वर आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.