कशेडी घाटातील एक बोगदा पावसाळयाप्रारंभी सुरू

कशेडी घाटातील एक बोगदा पावसाळयाप्रारंभी सुरू

rat5p40.jpg -KOP23L87171 -पोलादपूर ः तालुक्यातील भोगाव खुर्दपासून सुरू झालेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा भुयारी मार्ग तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत पोहोचलेली दोन्ही भुयारे आणि आतील बाजू.

कशेडी घाटातील एक बोगदा पावसाळयात सुरू
दुसरा गणेशोत्सवापूर्वी ; राष्ट्रीय महामार्गकडून संकेत
सकाळ वृत्तसेवा
खेड ,ता.५ः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे काम आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत असून येत्या पावसाळयाप्रारंभी एक भुयारी मार्ग तर गणेशोत्सवापूर्वी दुसरा भुयारी मार्ग वाहतुकीस खुले करण्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले आहेत.
महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर कशेडी घाटामध्ये अपघातप्रवण क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता धोकादायक वळणे आणि खोल दरीमुळे निर्माण झाली होती. यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाचे नियोजन करण्यात आले.
सह्याद्रीचा कातळ फोडून दोन भुयारांमध्ये प्रत्येकी तीन पदरी दोन मार्गिका उभारण्याचे काम सुरू झाले असून हे काम पूर्ण होईल तेव्हा 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून पूर्ण झाला असेल. 2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत असून या भुयारांना जोडणाऱ्या ऍप्रोच रोडचे आणि ऍप्रोच रोडवरील पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या पावसाळयाच्या प्रारंभीच दोन्हीपैकी किमान एक भुयारी मार्ग तीन पदरी मार्गिकेसह वाहतुकीस खुला होऊ शकणार आहे. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयाराचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा वापर करण्यात आला आहे. भुयारामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला आहे.
या घाटातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत असे प्रत्येकी 1.84 कि.मी. अंतराची दोन म्हणजे एकूण 3.44 किलोमीटर लांबीचे हे दुहेरी भुयारीमार्ग पूर्णत्वास गेले असून आतील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच भुयाराचे काँक्रीटचे पिचींगचे कामही वेगाने पुर्ण केले जात आहे. भुयारापर्यंत दोन्ही बाजूने जोडणारा 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का ऍप्रोच रोडचे काम सुरू झाले असल्याने या ऍप्रोच रस्त्यावरील तीन पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही भुयारी मार्ग या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहे.

चौकट
वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील पूर्ण
आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील पूर्ण झाले असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला असून आतील भागात परत यु-टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com