rat0540f.txt

rat0540f.txt

अल्पवयीन मुलांच्या राड्याने पोलिसही अवाक
त्नागिरीतील घटना ः पालकांसह मुलांना समज, दोघाना नोटीस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ः सध्याचे मुलांचे मोबाईलवरील इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअप या वेडापाई सध्या एकमेकांना शेअर करत असलेले फोटो, व्हिडिओ यामुळे परस्परात वादंग निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. काल (ता.४) रात्री इंस्टाग्रामवर फोटो टाकल्याच्या रागातून मध्यरात्री शहरातील एकता मार्ग येथील रस्त्यावर राडा झाला. सिनेमासारखी ही मारमारी असल्याने अनेकांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर केले. या घडलेल्या घटनेमुळे पोलिसही अवाक झाले.कारण ही सारी मुले अल्पवयीन होती. या राड्याच्या कारवाईत शहर पोलिसांनी पालकांसह मुलांना समज दिली व नोटीस बजावली आहे.
ही घटना शनिवारी (ता. ४) रात्री अकरा ते बारावाजण्याच्या सुमारास शहरातील एकता मार्ग येथे भर रस्त्यात घडली. दोन गटात तुंबळ हाणामारी सराईत गुन्हेगारांसारखी हाणामारी झाली. या मारहाणीची व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. मात्र शहरातील कायदा व्यवस्था धोक्यात आली असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. परिसरात दोन वाड्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये हा राडा झाला. मात्र पोलिसांची गाडी आल्यावर सिनेमात दाखविल्या प्रमाणे सगळे पळून गेले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल घेऊन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी यांनी हाणामारी करणारी मुले आणि त्यांच्या पालकांना शहर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. ५) चौकशीसाठी बोलावून घेतले. पालकांच्या समोरच हाणामारी करणाऱ्या मुलांना बोलते केले. त्यावेळी सराईत गुन्हेगारांसारखी हाणामारी करणारी ही मुले अल्पवयीन असून सध्या त्यांच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र त्यामध्ये दोन तरुण आहेत. पोलिसांनी मुलांना योग्य ती समज देवून पालकांनाही आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच अल्पवयीन नसणाऱ्या दोन मुलांना नोटीस बजावली. मात्र मध्यरात्री शहरात घडलेल्या या प्रकाराने पोलिस देखिल अवाक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com