मतदान यंत्र आणि तंत्र

मतदान यंत्र आणि तंत्र

rat०७११.txt

बातमी क्र.. ११

(२८ फेब्रुवारी टुडे पान तीन)

टेक्नोवर्ल्ड.....लोगो

rat७p१४.jpg ः
८७३३१
संतोष गोणबरे


मतदान करणे हीच मुळी फालतुगिरी आहे, असं समजणारा खूप मोठा पांढरपेशा वर्ग समाजात आहे. एका मताने उमेदवार पडला किंवा एका लोकप्रतिनिधीमुळे त्रिशंकू परिस्थिती उद्भवली अशी लोकशाहीत अनेक उदाहरणे सापडत असताना देखील बरेचजण सुट्टीचा वार म्हणून बुथवर जाणंच टाळतात. ‘मतदान यंत्रात घोळ आहे’ असे मोठमोठ्याने टीव्हीवर ओरडून सांगणाऱ्या तथाकथित बुद्धिजिवींवर विश्वास ठेवतात; तेव्हा खरंतर लोकशाही विमनस्क मानसिकतेत पराभूततेचे अरण्यरूदन करते ते मात्र कोणालाही ऐकू येत नाही. आज तंत्रज्ञान नव्या वाटा शोधत असताना जुन्या विसंगत पद्धती कवटाळून समोर येतील ते नाकारणे किंवा मुकाट स्वीकारणे यापेक्षा तांत्रिक बाबी पडताळून जर योग्य निष्कर्षाप्रत आपण पोहोचणार असू तर आणि तरच आपल्या तौलनिक बुद्धीचा आपण विवेकी वापर केला, असे म्हणता येईल.

संतोष गोणबरे,चिपळूण
---

मतदान यंत्र आणि तंत्र

मतदान यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशिन ज्याला आपण ईवीएम म्हणतो त्याचा पहिला वापर भारतात प्रायोगिक स्वरूपात सर्वप्रथम केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये पारूर या मतदार संघात १९ मे १९८२ ला केला गेला तरी त्याचा खरा वापर १९९२ पासून सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत बरेच बदल आणि टीकाटिप्पण्या सोसत ही यंत्रणा कार्यरत आहे. ईवीएम यंत्र हे स्वयंचलितरित्या मतदान करण्यासाठीचे यंत्र असते. अनेकदा या यंत्रातच मतमोजणीही करता येते. अगदी पंचायत समिती ते लोकसभा निवडणुकांमध्येही मतदान करण्यासाठी मतपेटी व मतपत्रिकांऐवजी मत नोंदवण्यासाठी अशी यंत्रे वापरली जातात. जगातली सर्वात मोठी लोकशाही असल्यामुळे भारतात निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
पूर्वी कागदावर चिन्हे छापून शिक्का मारून मत द्यायची पद्धत होती. अफाट लोकसंख्या, खूप उमेदवार, दुर्गम प्रदेश, अशिक्षित जनता तसेच मनुष्यबळ व इतर साधनांवर होणारा खर्च आणि महत्वाचे म्हणजे रात्री उशिरापर्यंत चालणारी मोजणीप्रक्रिया यावर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे वापरण्यास सुरवात झाली. जगभरातील अनेक देश, अगदी अमेरिकेपुढेही याच समस्या असूनही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर भारतात अधिक होत आहे. मानवी इतिहासात मतदानाने निवड करण्याची आणि निर्णय घेण्याची पद्धत प्राचीन काळापासून नगरराज्ये व गणराज्यांतून अस्तित्वात आहे. गुप्त मतदान पद्धतीत गोट्या, शिंपले, शंख इ. साधने प्राचीन काळी ग्रीसमध्ये वापरली जात असत तर रोममध्ये प्रत्येक उमेदवारासाठी विशिष्ट प्रकारे कोरलेले लाकूड देण्यात येत असे. उघड अगर खुले किंवा आवाजी मतदान, हात वर करून किंवा उभे राहून अथवा एखाद्या गटामध्ये जाऊन केले जाते. उघड मतदानाची पद्धत आधुनिक काळात काही निवडकप्रसंगी मर्यादित क्षेत्रापुरती वापरण्यात येते.
जगातीले पहिले ईवीएम मशिन प्रात्यक्षिक जैकब मायर्स याने १८९२ ला लॉकपोर्ट, न्यूयॉर्क येथे शहर निवडणुकीत दाखवले होते.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या संस्थने बेंगलोर आणि हैदराबाद येथे बनवलेल्या या इलेक्ट्रॉनिक यंत्राची बांधणी अस्सल भारतीय बनावटीची असून, अत्याधुनिक सूक्ष्म प्रक्रियक (मायक्रोप्रोसेसर) तंत्रज्ञानाच्या आधारे हे यंत्र बनवले आहे. ६ व्होल्ट डीसी बॅटरी वापरून चालणाऱ्या या मशिनला कोणताही वीजपुरवठा करावा लागत नाही. कमाल २ हजार मते एकत्र संकलित करण्याची क्षमता आणि १५० उमेवार असे गणित गृहित धरून साध्या गणकयंत्राप्रामाणे फक्त सरळरेषीय मोजणी करण्याचे काम हे मशिन करते. गुणाकार वा भागाकार करण्यासाठी म्हणजे मते वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोसेसर या यंत्रात नसतो. त्यामुळे ''व्हायरस आणि ट्रोजन्स'' या मशिनमध्ये शिरून धुमाकूळ घालेल आणि मतांचा उलटफेर करेल, ही शक्यता तकलादू ठरते. जर आपण मोबाईल उदाहरण म्हणून नजरेसमोर धरला तर त्यात प्रोग्रॅम तयार करण्याचे आवश्यक हार्डवेअर आणि पूरक असे सॉफ्टवेअर दोन्हीही सिद्ध असतात; मात्र हेच उदाहरण साध्या कॅल्क्युलेटरसाठी वापरायचे म्हटले तर लक्षात येते की, इथे नव्याने प्रोग्रॅम तयार करता येत नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे किती सुरक्षित आहेत हे सिद्ध करणारे एक आवाहन भारतीय निवडणूक आयोगाने केले होते आणि दिलेल्या मुदतीत इंटरनेटचा वापर करून मतदान यंत्र हॅक करायचे होते; मात्र मशिनकोडला सरावलेला आणि अल्गोरिदम तयार करण्यात प्रावीण्य असलेला कोणताही हॅकर त्यात यशस्वी झालेला नाही. मुळात या यंत्राचे ओपन सोर्स कोड उपलब्ध नाहीत ज्यातून मायक्रोप्रोसेसरचे फ्लॅग्स पुर्नस्थापित करता येतील.
मतदानानंतर ईवीएम मशिन एका बॉक्समध्ये ठेवून त्यावर शिक्का मारला जातो आणि ते बॉक्सेस स्ट्राँग रूममध्ये व्हिडिओ कॅमेऱ्याच्या नजरेखाली संरक्षित केले जातात. बाहेर पोलिस, निमलष्करी दल, आवश्यकतेनुसार लष्करी दल आणि न सांगता उभारलेला राजकीय पक्षांचा पहारा असतो. अशा वेळी कितीही पैसा वापरला तरी या सर्व सुरक्षायंत्रणा, व्हिडिओ यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, राजकीय यंत्रणा आणि मशिनशी छेडछाड करणारी हॅकरयंत्रणा यांनी जर संगनमत केले आणि सर्वांनी सहमतीने काही घपला केला तर आणि तरच मतप्रक्रियेचा उलटफेर करणे, ही शक्यता शंभराच्या एक शुन्यांश उरते.
आपण लोकशाही मानतो त्यामुळे सर्वांची मतमतांतरे यांचाही आदर करतो. आपली सद्सद्विवेकबुद्धी जोवर शाबूत आहे तोवर आपण शंका व्यक्त करत राहणार आणि विवेक शाबूत ठेवत त्या शंकांची सुयोग्य उत्तरेही आपणच मिळवणार. बुद्धिजीवी हे निर्माण करण्यात माहीर असतील तर सापेक्ष बुद्धिभाव आपणच शोधला पाहिजे नाही का..?
(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com