
कचऱ्याचे दहन करून पिंगुळीत अनोखी होळी
87348
पिंगुळी ः म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवांमार्फत कचरा दहन करून अनोखी होळी साजरी करण्यात आली.
कचऱ्याचे दहन करून
पिंगुळीत अनोखी होळी
कुडाळ ः पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असताना पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवांमार्फत कचरा गोळा करत त्याचे दहन करून अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेवून गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना गावाच्या नुकसानीबाबत जाणीव करून दे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्याची विल्हेवाट लावण्याची बुद्धी दे, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळीं व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष राघोबा धुरी, भूषण तेजम, सतीश माडये, साईराज जाधव, पंकज गावडे आदी उपस्थित होते.
..............
तरंदळेत आज महिलादिन
कुडाळ ः तरंदळे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त उद्या (ता. ८) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आत. सकाळी पावणे नऊला कार्यक्रमाचे उद्घाटन, दहाला तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, साडेदहाला जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये तरंदळे शाळा नंबर एकच्या लहान गटाने उपविजेतापद मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार, दुपारी दोनला महिलांसाठी व गावातील विधवांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी त्यांना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. दुपारी अडीचला गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान, साडेतीनला कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.