धाकोरे येथे मनसेतर्फे सोलर लाईटचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धाकोरे येथे मनसेतर्फे 
सोलर लाईटचे लोकार्पण
धाकोरे येथे मनसेतर्फे सोलर लाईटचे लोकार्पण

धाकोरे येथे मनसेतर्फे सोलर लाईटचे लोकार्पण

sakal_logo
By

87354
धाकोरा : सोलार लाईटचे लोकार्पण करताना सरपंच स्नेहा मुळीक, मनसे पदाधिकारी आदी.

धाकोरे येथे मनसेतर्फे
सोलर लाईटचे लोकार्पण
सावंतवाडी, ता. ७ ः होळी पौर्णिमेनिमित्त काल (ता. ६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने धाकोरे गावात दोन सोलार लाईटचे लोकार्पण करण्यात आले. धाकोरे-धनगरवाडी सड्यातील वस्तीवर तसेच हनुमान मंदिर येथे या दोन सोलर लाईटचे लोकार्पण माजी सावंतवाडी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से. जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक व मनसे लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांच्या हस्ते झाले.
मागील काही वर्षे या भागामध्ये रात्रीच्या वेळी विजेअभावी ग्रामस्थ त्रस्त होते. ही बाब मनसेचे धाकोरे शाखाध्यक्ष नीलेश मुळीक यांच्या लक्षात येताच त्यांनी म.न.वि.से. जिल्हाध्यक्ष सुभेदार यांच्या कानी घातली. सुभेदार यांनी त्वरित त्याची दखल घेतली. मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, सह संपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांच्यामार्फत दोन सोलर लाईट उपलब्ध करून दिले. त्यांचे काल लोकार्पण करण्यात आले. मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष कदम यांचे धाकोरेवासीयांनी आभार मानले. यावेळी मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे लॉटरी सेनेचे माजी सचिव आबा चिपकर, म.न.वि.से. उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, शाखाध्यक्ष मुळीक उपस्थित होते.