आयुर्वेदाने राहाल पूर्णपणे निरोगी

आयुर्वेदाने राहाल पूर्णपणे निरोगी

rat०७२०.txt

बातमी क्र.. २० (टुडे पान ३ साठी)

- rat७p१७.jpg-
८७३३८
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात वैद्य सुविनय दामले यांचा सत्कार करताना आयुर्वेदिक औषधविक्रेते उमेश आंबर्डेकर. सोबत अॅड. दीपक पटवर्धन.

आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी रहा

वैद्य सुविनय दामले; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, ता. ७ ः माणूस हा नक्कीच औषधांशिवाय जगू शकतो. ऋतूनुसार आहारपद्धतीत बदल करत आणि सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच अन्न खावे. योग्य व्यायाय, प्राणायाम आणि आहार यांची सांगड घालून निरामय जीवन जगणे शक्य आहे. आयुर्वेद शास्त्राच्या उपयोगातून तुम्ही शंभर टक्के निरोगी राहू शकाल. आयुर्वेद हे निसर्गासोबत आणि मुळापासून विचार करणारे शास्त्र आहे, असे प्रतिपादन कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांनी केले.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आयोजित वैद्य सुविनय दामले आपल्या भेटीला या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. दामले यांच्या व्याख्यानातून अनेकांना फायदा झाला आणि मनातील शंका दूर झाल्या. आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही निरोगी, निरामय जीवन जगू शकता, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम सुमारे साडेचार तास सुरू होता. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनेकांनी आपापल्या समस्या मांडल्या.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या भागोजीशेठ कीर सभागृहात हा कार्यक्रम रंगला. जेवणाच्या पद्धतीविषयी दामले म्हणाले, जेवताना तुम्ही कसलाही विचार करू नका. केवळ मनसोक्त जेवा. जेवताना ताटात असणाऱ्या पदार्थांचा, त्यांच्या चवींचा आनंद घ्या. पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने जेवणाची अनुभुती घ्या. आजकाल हेच लोक करत नाहीत आणि यामुळेच अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्याचप्रमाणे हल्ली बरेचजण जेवल्यानंतर झोपतात अन्यथा पहुडतात जे अत्यंत चुकीचे आहे. ज्यामुळे जेवण नीट न पचल्याने रोग निर्माण होतात.
वैद्यकीय व्यवसायात होणाऱ्या कट प्रॅक्टिसबाबत दामले यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एखाद्या रोगासाठी कायमस्वरूपी गोळ्या घेऊन अन्य व्याधी उपटतात. त्यामुळे पुन्हा त्यावर दुसऱ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा फटका किडनीला बसतो नंतर डोळ्यांवर परिणाम होतो. गोळ्या, औषधांचे दूरगामी परिणाम कोणीही लक्षात घेत नाही आहे. ज्यामुळे आनंद, समाधान आणि मनसोक्त जीवनापासून आपण कमालीचे दूर जातो. सध्या काही ठिकाणी थंडीचे वातावरण आहे. अशात अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी जातात; परंतु आयुर्वेदात ही संज्ञाच नाही. शरीरासाठी योग्य व्यायाम आपल्या संस्कृतीत प्रदक्षिणा, लोटांगण, योग हाच आहे तोच प्रत्येकाने करावा, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आनंद पाटणकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com