विज्ञान, तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाहावर परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान, तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाहावर परिषद
विज्ञान, तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाहावर परिषद

विज्ञान, तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाहावर परिषद

sakal_logo
By

rat०७१०.TXT

बातमी क्र.. १० (टुडे पान ३ )

rat७p५.jpg-

८७३२४
वेळणेश्वर ः राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी.


विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रवाहावर परिषद

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयोजन ; संशोधकांचा सहभाग

गुहागर, ता. ८ः तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर राष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारतातील विविध तज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त तंत्रज्ञानामधील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर २८ फेब्रुवारी व १ मार्च असे दोन दिवस राष्ट्रीय परिषद विज्ञान परिषद घेण्यात आली. पहिले व्याख्यान डॉ. सुधाकर आगरकर यांचे होते. त्यांनी स्टीमपासून सेन्सरपर्यंतच्या विविध औद्योगिक क्रांतीचा सामाजिक व आर्थिक परिणाम विशद केला. त्यानंतर डॉ. घोंगे यांनी संशोधकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये असणारी आव्हाने व संधी यांचा उलगडा केला. तमिळनाडू येथील डॉ. संथनम यांनी तंत्रज्ञानामधील गणिताचा वापर व गणिताच्या प्रगतीसाठी लागणारे तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. या परिषदेत भाभा अणुसंशोधन केंद्रातील चार ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी आपले संशोधन सादर केले. यामध्ये जयंत कयाल यांनी ओरिगामीचा विज्ञान व तंत्रज्ञानातील वापर, शर्मा यांनी भारताची ऊर्जेची गरज, ऊर्जानिर्मिती साधने व आव्हाने, कारखानीस यांनी पुरवठा साखळी व्यवस्थापन व गोळे यांनी उपकरणीय शास्त्रातील संशोधनाची नवी दिशा या विषयावर संशोधन सादर केले.
उद्‌घाटन सत्रात प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांनी स्वागतपर भाषण केले. परिषदेचे समन्वयक डॉ. अमितकुमार माने यांनी परिषद आयोजन करण्यामागचे हेतू, भारतातील संशोधनकार्य याबाबत विचार मांडले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी भारताच्या विकासामध्ये युवकांनी आपला सहभाग वाढवण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. पंढरीनाथ घोंगे यांनी संशोधकांसाठी शिस्त व नीतिमत्ता आवश्यक आहे, असे मत परखडपणे मांडले.