‘ग्रीन मसल्स’ची शेती आता अधिक व्यापक

‘ग्रीन मसल्स’ची शेती आता अधिक व्यापक

87404
शिणानेचे बीज एकत्रित करताना बचतगट सदस्य.
87406
87408
शिणान्यांची माळ अन् शिणाने

‘ग्रीन मसल्स’ची शेती
आता अधिक व्यापक

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत प्रयोग; कर्नाटकमधून बीज दाखल

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नैसर्गिकरित्या ‘ग्रीन मसल्स’ अर्थात शिणाने मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याला असलेली मागणी लक्षात घेता याचा खाऱ्या, निमखाऱ्या पाण्यात पालन प्रकल्प राबविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे यंदा दोन्ही जिल्ह्यांत याची व्याप्ती वाढविण्यात येणार असून यासाठीचे बीज कर्नाटकमधून आणले आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील खाड्यांमध्ये तसेच समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ भागांमध्ये काही प्रमाणात शिणाने आढळून येतात. स्थानिक भाषेमध्ये त्यांना ‘वाकुंडी’ किंवा ‘काकई’, असे म्हणतात. शिणाने औषधी गुणांमुळे प्रसिद्ध आहे. त्यांच्या कवचामधून निघणाऱ्या चिकट धाग्याने ते खडक, होड्यांच्या तळांना तसेच समुद्राच्या तळाशी असणाऱ्या कोणत्याही कठीण वस्तूंना घट्ट पकडून राहतात. खाड्यांमध्ये मिळणाऱ्या शिणानेंना (ग्रीन मसल्स) देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे; परंतु खाड्यांमधील नैसर्गिक अधिवासामध्ये शिणानींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करता राज्याच्या किनारी भागात शिणानेंची खाऱ्या-निमखाऱ्या पाण्यात शेती करण्याच्या पर्यायांचा विचार होत आहे. यासाठी कर्नाटकमधून शिणानेंचे बीज आणून त्याचे पालन प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कांदळवन फाउंडेशनने घेतला आहे. त्यादृष्टीने केरळमधून शिणाने महाराष्ट्रात दाखल झाले असून सध्या त्यांची ४७ युनिट साठवण केली आहे.
सरकारच्या कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत २०२२-२३ या वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २०, तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४ बचतगटांनी शिणाने पालन प्रकल्प राबविला होता. या प्रकल्पामधून एकूण २६,७९,३७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी शिणानेचे बीज आणून पालन प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कांदळवन फाउंडेशनने घेतला असल्याचे सांगण्यात आले. यंदा या पालन प्रकल्पाची व्याप्ती वाढविली आहे.
...............
औषधी गुणधर्म
* शिणाने किनारपट्टीवरील नागरिकांच्या सकस पाण्यातील द्विदलीय शिल्प शिंपल्यांमध्ये ‘कालवे’ ऑयस्टर आणि ‘शिणाने’ हे चव आणि औषधी गुणधर्मांमुळे विशेष प्रसिद्ध.
* कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण भागांमध्ये शिणाने मोठ्या प्रमाणावर गोळा करून खाल्ले जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त खनिजे, स्निग्ध पदार्थ, अमिनो आम्ल, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म तसेच जीवनसत्वे असतात.
* भारतात खाद्य आणि व्यापारासाठी शिणानेंच्या दोन प्रजाती, हिरवे शिणाने (फार्मा विरडीस) आणि तपकिरी शिणाने (पर्ना इंडिका) मुख्यत्वे वापरल्या जातात.
..................
कोट
ग्रामस्थांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता यावर्षी सर्व प्रकल्पांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. शाश्वत उपजीविका निर्माण योजनेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. या योजनेमुळे वन विभाग आणि किनारी समुदाय यांच्यातील भावबंध अधिकच घट्ट होऊ शकतात.
- वीरेंद्र त्रिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष आणि कार्यकारी संचालक कांदळवन प्रतिष्ठान
.................
कोट
देवगडमधून पाच बचतगटांनी यावर्षी शिणाने पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी या योजनेतून सर्वच बचतगटांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले. कांदळवन प्रतिष्ठानच्या उपजीविका प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खाडीतील कमी झालेले शिणानेंचे प्रमाणही वाढण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
- लक्ष्मण तारी, सदस्य, कांदळवन सहव्यवस्थापन समिती, तारामुंबरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com