
वाहने पार्क करायची कोठे?
ग्राउंड रिपोर्ट लोगो २२ फेब्रुवारी टुडे१ वरून घेणे
rat७p३०.jpg-KOP२३L८७३९९ रत्नागिरी- पालिकेचे पार्किंग असलेली राम आळीतील ही जागा कायम कर्मचारी आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांमुळे फुल्ल असते.
rat७p३१.jpg-KOP२३L८७४००
आठवडा बाजारातील पार्किंगसाठी असलेली जागा.
rat७p३२.jpg-KOP२३L८७४०१
आठवडा बाजार येथे याच जागेच्या मागे पालिकेने विकसित केलेली नवीन जागा. परंतु ती ट्रॅव्हल्स आणि वडापच्या गाड्यांनी व्यापलेली असते.
rat७p३३.jpg-KOP२३L८७४३६
पोस्ट कार्यालयासमोरील पालिकेचा आरक्षित भुखंड.
rat७p३४.jpg- KOP२३L८७४३७
फळे आणि भाजी-पाला विक्रते मुख्य रस्त्यात बसतात आणि त्यापुढे वाहनं लागत असल्याने अर्धा रस्त्यात व्यापून वाहतुक कोंडी होते.
इंट्रो...
सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवाला रत्नागिरी शहरात यायच म्हटंल की, वाहनं कुठे पार्क करायची, या गंभीर समस्येला वाहनधारकाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे खरेदीला किंवा फिरायला येणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडते. गेल्या २० वर्षांपासून नेहमी भेडसावणाऱ्या या प्रश्नाकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. वाढते शहरीकरण आणि वाहनांच्या वाढत्या संख्येचा विचार करून शहरात आरक्षित असलेले पार्किंगचे २० भूखंड अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. वीस वर्षांमध्ये शहरात पालिकेने फक्त पाच ते सहा ठिकाणीच पार्किंगची व्यवस्था केली आहे. पे अॅण्ड पार्कचा तर पत्ता नाही. पार्किंगची ठिकाणं बाजारपेठ सुरू होण्यापूर्वी फुल्ल झालेली असतात. खरेदीसाठी येणाऱ्यांनी गाड्या लावायच्या कुठे असा प्रश्न वाहनधारकांपुढे असतो. त्यात अन्यत्र रिकाम्या जागेवर वाहने लावल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून नो-पार्किंग म्हणून दंडात्मक कारवाई होते. मग शहरात वाहने पार्किंग करायचे कुठे, या समस्येने वाहनधारक हैराण आहे. पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस याचा विचार करणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजेश शेळके, रत्नागिरी
रत्नागिरीत वाहने लावायची कोठे?
पार्कींग, नियोजनाचा अभाव ; वाहनतळ कमी, २० आरक्षित जागांचा विकास रखडला
रत्नागिरी शहराचा गेल्या २० वर्षांमध्ये चांगलाच विस्तार झाला आहे. आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. निवासी, व्यापारी संकुलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही संख्या आता ३० हजाराकडे गेली आहे. त्या तुलनेत पायाभुत सुविधांही विकसीत केल्या जात आहे. भविष्यात २५ ते ३० वर्षांचा विचार करून शहराचा आऱाखडा तयार केला जात आहे. एकीकडे शहराचा चेहरामोहरा बदलत असताना मोठी उणीव भासते ती वाहने पार्किंगची. वाहने दळणवळणाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहने आहेत. परंतु या सर्वांचा सारासार विचार केला तर रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कमालीची सुधारणा झाली आणि हळुहळु विस्तार होत आहे. बाजारपेठ वाढत चालली आहे. परंतु त्या तुलनेत पार्किंगची सोय पालिकेकडून करण्यात आलेली नाही. पार्किंगसाठी शहरामध्ये जवळपास २० आरक्षित जागा आहेत. परंतु गेल्या २० वर्षांमध्ये त्यापैकी दोन चार जागाच विकसित झाल्या आहेत.
-------------------
... या सण, उत्सवाला समस्या
आषाढी एकादशी, शिमगोत्सव, दिवाळी, दसरा, पडवा, दहिहंडी आदी सणासुदीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीला किंवा फिरायला येतात. तेव्हा प्रामुख्याने ही समस्या जाणवते. पालिकेने शहरामध्ये गेल्या २० वर्षांमध्ये फक्त आठवडा बाजार, मारूती मंदिर, पोस्ट ऑफिस समोर, रामआळी, कलेक्टर कंपाऊड आहे, एसपी ऑफिस या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला दुचाकींसाठी पार्किंग आहे. ते स्थानिक लोकांच्या गाड्यांनीच फुल्ल होते. खरेदी किंवा फिरायला येणाऱ्यांना वाहने लावण्यासाठी पार्किंगच मिळत नाही.
पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडी
पालिकेचे जेमतेत पार्किंग प्लॉट आहेत, ते आधीच फुल्ल झालेले असतात. परिणामी पार्किंगला जागा नसल्याने रिकाम्या जागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. आधीच रस्त्यामध्ये फळे, भाजी-पाला विक्रते बसलेले असतात. त्यापुढे वाहने लागतात. अर्ध्या रस्ता त्यामध्ये व्यापला जातो आणि वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहतुक पोलिस आणि पालिकेने हॉकर्स झोन तयार करून दिले तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांना कारवाईतच रस
एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू आहे. पार्किंगचे अनेक प्लॉट आरक्षित आहेत, मात्र त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे नो पार्किंगची कारवाई होते. परंतु पार्किंगसाठी कुठे जागा आहे, हे दाखविणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा पोलिसांना कारवाईतच रस असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याचे वाहनधारकांचे मत आहे.
...असे नियोजन हवे
एकिकडे वाहतूक पोलिस नो पार्किंगमध्ये लावल्याला वाहनांवर कारवाई करतात. तर दुसरीकडे पालिकेने शहरात चार ते पाचच ठिकाणी पार्किंगचे प्लॉट विकसित केले आहेत. त्या जागा नेहमी वाहनांनी भरलेल्या असतात. त्यामुळे बाजारात खरेदीला आल्यास वाहने पार्किंग करायची असे, बोर्डच दिसत नाहीत. पालिकेशी समन्यव करून वाहतूक शाखेने आदी पार्किंगच्या जागा विकास केल्या पाहिजेत. त्यानंतरही नो पार्किंगमध्ये वाहने लावली तर कारवाई केली पाहिजे, असे नियोजन करण्याची गरज आहे.
मानसिकता बदलायला हवी
पालिकेने आठवडा बाजारामध्ये प्रशस्त पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु वाहनधारकांना खरेदीच्या ठिकाणी वाहन लावायचे असते. आठवडा बाजारात वाहन लावून चालत येणे ही मानसिकता नाही. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनधारकांनी वाहने आठवडा बाजार पार्किंगमध्ये लावली तर ही समस्या राहणार नाही, असे मत वाहतुक पोलिसांचे आहे.
कोट...
शहराचा विस्तार होत असल्याने पालिकेने शहरातील पार्किंगचे प्लॉट विकसित करण्याची गरज आहे. परंतु त्या तुलनेत असलेले पार्किंग प्लॉट कमी पडत आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहक पार्किंग मिळत नाही म्हणून बाजारात येत नाही. त्याचा बाजारपेठेवरही परिणाम होत आहे. ग्रामीण भागातून येणारी व्यक्ती त्यालाही निश्चित कुठे वाहन पार्किंग करायचे हे माहित नसते. नको तिथे वाहन लावले की वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. हे सर्व कुठेतरी थांबायला हवे.
- नीलेश भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष
कोट...
शहरातील पार्किंगच्या जागा विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकतीच मारुती मंदिर येथे एक जागा विकसित केली आहे. वाहतुक पोलिसांशी समन्वय साधुन त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. पालिकेकडे जसा निधी उपलब्ध होईल, तसा त्या जागेंचा विकस केला जाईल. वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी लवकरच आम्ही सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
-तुषार बाबर, पालिका मुख्याधिकारी