
माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात
rat०७२९.txt
बातमी क्र.. २९ (टुडे पान ३ साठी)
rat७p२०.jpg-
८७३४१
देवरूख ः महाराष्ट्र माध्यमिक शिक्षकसंघाच्या सभेत बोलताना सागर पाटील. सोबत शिक्षक पदाधिकारी.
शाळेतील सर्वांनी संपात सहभागी व्हा
सागर पाटील; जुन्या पेन्शनसाठी राज्यव्यापी बेमुदत संप
रत्नागिरी, ता. ७ ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्यावतीने १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप होणार आहे. यात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सर्व घटकांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केले.
देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात आयोजित सभेत पाटील बोलत होते. जुनी पेन्शन योजना हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले, असे पाटील म्हणाले. या वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब संघटना या संपात पूर्ण क्षमतेने उतरत असल्याचे जाहीर केले.
रत्नागिरी जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारीदेखील या संपात सहभागी असल्याचे स्पष्ट केले. अध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीष पाटील, सुशांत कविस्कर, गणपत शिर्के, कास्ट्राईब संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद पाटील, अध्यापक संघाचे सल्लागार आत्माराम मेस्त्री, रामचंद्र महाडिक, मुख्याध्यापक संघाचे दापोली अध्यक्ष संतोष हजारे, चिपळूण अध्यक्ष संजय चव्हाण, महिला प्रतिनिधी मुनव्वर तांबोळी, चतुर्थ श्रेणी संघटनेचे सचिव दिनेश वेताळे यांच्यासह तिन्ही संघटनांचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सचिव, सभासद व पतपेढीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिवपदी सागर पाटील
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांची राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. समन्वय समितीचे सचिवपद म्हणजे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांना मिळालेला सन्मान असून, जिल्ह्यात प्रथमच माध्यमिक शिक्षकाला हे पद मिळाल्याचे रोहित जाधव यांनी सांगितले.