शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी कासार्डे विद्यालयात संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी 
कासार्डे विद्यालयात संवाद
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी कासार्डे विद्यालयात संवाद

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी कासार्डे विद्यालयात संवाद

sakal_logo
By

८७४३८


शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी
कासार्डे विद्यालयात संवाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ : भविष्यात काहीतरी करायचे, हीच इच्छा महत्त्वाची आहे. त्यासाठी लागणाऱ्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो; मात्र अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये, यासाठी लीलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्नरत राहील, असे प्रतिपादन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश नारकर यांनी केले. ते कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, मुख्याध्यापक एम. डी. खाडये आदी उपस्थित होते. फाउंडेशनकडून दरवर्षी ५० गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे एकूण अडीच लाखाची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्त्ती प्राप्त विद्यार्थ्यांशी ओळख, त्यांची स्वप्ने आणि फाउंडेशनकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक खाडये यांनी फाउंडेशनची संकल्पना स्पष्ट केली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती रकमेचा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले.