आरोग्य विभागामार्फत आज महिलांसाठी विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागामार्फत आज 
महिलांसाठी विविध उपक्रम
आरोग्य विभागामार्फत आज महिलांसाठी विविध उपक्रम

आरोग्य विभागामार्फत आज महिलांसाठी विविध उपक्रम

sakal_logo
By

आरोग्य विभागामार्फत आज
महिलांसाठी विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत महिलादिनानिमित्त उद्या (ता. ८) जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात येणार आहेत. शासनाच्या ''हेल्दी वूमन, हेल्दी इंडिया'' उपक्रमांतर्गत सायकलिंग, योगा, आरोग्य विषयक मार्गदर्शन असे उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत महिलादिनी जिल्ह्यातील महिला व महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथे, तर आठही तालुक्यांत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दिवशी आशा कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाभरात ''आशा डे'' साजरा केला जाणार आहे. याशिवाय सायकलिंग, योगा यासारखे उपक्रम घेतले जाणार आहेत. महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. धुरी यांनी दिली. शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ''जन औषधी दिवस'' साजरा करण्यात आला. महिलांच्या आरोग्य तपासणीसह डायबिटीस, उच्च रक्तदाब, असलेल्या महिलांना एक महिन्याच्या गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या. तर महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी यापुढेही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. धुरी यांनी सांगितले.