संक्षिप्त-देवगडात आज 
नेत्र चिकित्सा

संक्षिप्त-देवगडात आज नेत्र चिकित्सा

संक्षिप्त

देवगडात आज
नेत्र चिकित्सा
देवगड ः येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. ८) सकाळी ९ ते १ या वेळेत मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे. शिबिरात संगणकाद्वारे अचूक चष्मा नंबर व मोतिबिंदू निदान करण्यात येईल. मोतिबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येतील. तसेच सवलतीच्या दरात चष्मे वाटप केले जातील. शिबिर डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, सातपायरी येथे घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी दयानंद पाटील यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत शनिवारी
वधू-वर मेळावा
देवगड ः गाबीत समाजाचा संयुक्तिक वधू-वर मेळावा शनिवारी (ता.११) सकाळी १० ते ५ या वेळेत सहदेवराव शेलटकर सभागृह मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ भांडुप पश्‍चिम (मुंबई) येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याचा तालुक्यातील बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मेळाव्यात मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या निमित्ताने प्रदीपकुमार सारंग व रसिका बांदकर यांच्याकरवी वधू-वरांच्या परिचय पत्रांचे वाचन होईल. तसेच वधू-वर, पालकांना बोलण्याची संधी मिळणार आहे. यावेळी आगाऊ नोंदणी न केलेल्या वधू-वरांचे सकाळी अर्ज भरून घेण्यात येतील. इच्छुकांनी प्रदीपकुमार सारंग, हरिश्‍चंद्र वस्त, रवींद्र भाबल किंवा रसिका बांदकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com