
भटक्या श्वानांची निर्बिजीकरण मोहीम सुरू
rat०७२८.txt
बातमी क्र..२८ ( पान २)
rat७p१९.jpg ः
८७३४०
चिपळूण ः भटक्या श्वानांना पकडताना कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्स या संस्थेचे सदस्य.
चिपळुणात भटक्या श्वानांची निर्बिजीकरण मोहीम
कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्स संस्था ; मोफत सेवा
चिपळूण, ता. ७ ः शहरात दोनवेळा भटक्या श्वानांची निर्बिजीकरण मोहीम राबवूनही त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढू लागल्याने त्याची गंभीर दखल घेत चिपळूण नगर पालिका प्रशासन व कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्स या संस्थेतर्फे शहरात भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रेबीज लसीकरण ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहर व परिसरात उनाड गुरे, गाढवं यांच्यासह भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नगर पालिकेने आतापर्यंत भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणावर लाखों रुपये खर्च केला आहे; मात्र निर्बिजीकरण मोहीम राबवूनही शहरात श्वानांची संख्या वाढू लागल्याने नगर प्रशासनही चिंतेत पडले आहे. सार्वजनिक ठिकाणी, मुख्य व अंतर्गत रस्ते, गृहसंकूल परिसरासह गल्लोगल्ली या श्वानांच्या झुंडी दिसून येत आहेत. मागील काही वर्षाचा अनुभव घेता ही भटकी कुत्री लोकांवर धावून येणे, गुरगुरणे, वाहनांच्या मागे लागणे एवढेच नव्हे तर लहान मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी करणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे संपर्क साधत या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
या श्वानांचे निर्बिजीकरण करणे हा एकमेव पर्याय नगर पालिकेकडे आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बिजीकरण करणाऱ्या कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्स संस्थेशी संपर्क साधत त्यांना चिपळुणात पाचारण केले आहे. संस्थेने विनाशुल्क या भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अँटी रेबीज लसीकरण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ६) मार्चपासून या संस्थेतील सदस्यांनी शहरात ही मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध परिसरात या संस्थेचे सदस्य फिरून भटक्या श्वानांचा शोध घेत आहेत तसेच त्यांना पकडून त्यांची तपासणी करत आहेत. ज्यांचे निर्बिजीकरण झालेले नाही त्या श्वानांची निर्बिजीकरण केले जात आहे. यापुढे चार ते पाच दिवस ही मोहीम शहर व परिसरात सुरू राहणार आहे.