करजगावी चंडिका- भैरी ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करजगावी चंडिका- भैरी ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट
करजगावी चंडिका- भैरी ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट

करजगावी चंडिका- भैरी ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट

sakal_logo
By

rat०७३१.txt

बातमी क्र..३१ ( पान २ )

फोटो : rat७p२४.jpg ः
८७३५१
बुरोंडी ः येथे झालेली दोन ग्रामदैवतांच्या पालख्यांची भेट.


करजगावी चंडिका- भैरी ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट

भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ; खाडीकिनारी सोहळा

दाभोळ, ता. ८ ः आपल्याला बहीणभावाचे नाते माहित आहे. त्यात दुरावलेल्या अथवा काही निमित्ताने एकमेकांपासून दूर असलेल्या बहीणभावाची गळाभेट होते तेव्हा त्या बहीणभावाला किती आंनद होतो हे सुद्धा आपण पाहिलेले, अनुभवलेले असते; मात्र ग्रामदेवतांमध्येसुद्धा बहीणभावाचे नाते असते आणि त्या बहीणभावाच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा शिमगोत्सवात रंगतो. हा सोहळा पाहण्यासाठी दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे यायला हवे. बुरोंडी आणि करजगाव सीमेवर रंगलेल्या चंडिका (बहीण) आणि भैरी (भाऊ) या ग्रामदेवतांच्या पालख्यांची झालेली भेट डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.
दापोली तालुक्यातील बुरोंडी गावात अगदी पूर्वापारपासून आयनोल आणि गोमराई येथील चंडिका या ग्रामदेवतेची पालखी आणि आपताडी, घुबडेवाडी, कलमवाडी, चिनकटे, तळेवाडी, थोरलाकोंड, तांबटवाडी, राणेवाडी, खारवीवाडी, कोळीवाडी, बाजारपेठ या वाड्यांतून निघालेली भैरीची पालखी अशा प्रकारे दोन पालख्या शिमगोत्सवात देवळाबाहेर बाहेर पडतात. यातील आयनोल गोमराईची ग्रामदैवता चंडिका देवी ही आपताडी, घुबडेवाडी, कलमवाडी, चिनकटे, तळेवाडी, थोरलाकोंड, तांबटवाडी, राणेवाडी, खारवीवाडी, कोळीवाडी, बाजारपेठ येथील भैरी ग्रामदैवतेची बहीण मानली जाते. शिमगोत्सवात या दोन पालख्या वेगवेगळ्या मार्गांनी एका दिवशी बुरोंडी खाडीकिनारी एकत्र येतात. या एकत्र येण्याला भाऊ-बहिणींची भेट म्हटली जाते. ही भेट शिमगोत्सवात अगदी पूर्वापार होत असते. या पालखींच्या भेटीदरम्यान दोन्ही देवतांना आपापल्या ढंगात गाऱ्हाणी घातली जातात आणि त्यानंतर चंडिका (बहीण) आणि भैरी (भाऊ) या नात्याने दोन ग्रामदैवतांची भाऊ बहीण या नात्याने बहीणभावांची भेट घातली जाते. हातांवर दोन्ही खेळ्यांकडून पालख्यांना उंचावून ग्रामदेवतांच्या पालख्या नाचवल्या जातात. हा पालखी नाचवण्याचा रंगलेला सोहळा पाहण्यासारखा असतो. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहात आणि ढोलताशांच्या गजरातील ते देखणे पालख्यांचे रूप हे लोकांना जगण्याची एक नवी उर्मी देते. हा नयनरम्य सोहळा पाण्यासाठी दरवर्षीच बुरोंडी, आयनोल, गोमराई येथील तर लोक असतातच; मात्र तामसतीर्थ, करजगाव, लाडघर परिसरातील गावकरीसुद्धा खास हा पालखीभेटीचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात. या पालखी भेटीनंतर दोन्हीं पालख्यांची वाजतगाजत एकत्र मिरवणूक बुरोंडी राणेवाडी येथे मानकरी यांच्या घरी जाते. राणेवाडी येथील मानकऱ्यांच्या येथे रात्रभर खेळी तमाशा सादर करून रात्रभर जागरण करतात, असा हा अपूर्व पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासारखा असतो.
--