संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

जिल्ह्यात मनरेगातून
४४८१ मजुरांना काम
रत्नागिरी ः कोकण विभागात मनरेगा योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ५ हजार २५ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामावर उपस्थित मजुरांची संख्याही वाढती असून, या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. सुरू असलेल्या कामांवर २४ हजार ६०३ मजुरांची नोंद झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ५११ कामांवर ४ हजार ४८१ मजुरांनी काम केले आहे.
कोकण विभागांतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नालेसफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोट्या नद्यांवरील मोऱ्यांची दुरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन या कामांची संख्या वाढवण्यात आली आहेत. मनरेगा ( महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) या योजनेंतर्गत विविध विभागांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या वाढत्या कामांमुळे लॉकडाउनच्या काळात बिघडलेले मजुरांचे आर्थिक गणित सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांतर्गत कृषी, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरू करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजुरांची संख्या ठाणे ३२२ कामे १ हजार ६९ मजूर, रायगड १९८ कामे ६५३ मजूर, पालघर २ हजार १४१ कामे १६ हजार ५५ मजूर, रत्नागिरी १ हजार ५११ कामे ४ हजार ४८१ मजूर, सिंधुदुर्ग ८५३ कामे २ हजार ३४५ मंजूर अशी आहे.
-----------

आमदार राजन साळवींनी
ढोल वादनाचा घेतला आनंद
रत्नागिरी : राजकीय धुळवड सुरु असताना आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी (ता. ७) धुलीवंदनाच्या निमित्ताने रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत ’श्री देव भैरी चे दर्शन घेतले. ही पालखी रत्नागिरी शहरात फिरत आहे. या पालखीला भक्तांची प्रचंड गर्दी आहे. पालखी रत्नागिरी शहरातील तेलीआळी येथे आली असता ठाकरे शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. साळवी यांनी दर्शन घेतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे ढोल वादनाचा मनमुराद आनंदही लुटला.