स्वाती पाटील यांना
विजयोत्सव पुरस्कार

स्वाती पाटील यांना विजयोत्सव पुरस्कार

८७४७२

स्वाती पाटील यांना
विजयोत्सव पुरस्कार
बांदा, ता. ७ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील कास नं. १ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती पाटील यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३२ गुणवंत महिलांना यावेळी पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी साहित्यिका व ज्येष्ठ विचारवंत सुजाता पेंडसे, जर्नालिस्ट फाउंडेशनच्या महिला विभाग अध्यक्षा मनीषा लोहार, अध्यक्ष राजीव लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. स्वाती पाटील या मूळच्या कोल्हापूर-चंदगड शिवनगे येथील असून गेली १७ वर्षे त्या सावंतवाडी तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निगुडे व सध्या कास नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह लोकसहभागातून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com