नाचणकर यांना पुरस्कार

नाचणकर यांना पुरस्कार

rat०७३७.txt

बातमी क्र..३७ (संक्षिप्त)

फोटो - ratchl७२.jpg ः
८७३९३
चिपळूण ः मान्यवरांच्या हस्ते नॅशनल एज्युकेशनल इनोव्हेशन अॅवॉर्ड स्वीकारताना उपक्रमशील शिक्षक योगेश नाचणकर.

नॅशनल इनोवेशन अॅवॉर्डने नाचणकर सन्मानित

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी, चिंचघरी (सती) विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक योगेश नाचणकर यांना स्टेट इनोवेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशन, सोलापूर महाराष्ट्र यांनी नॅशनल एज्युकेशनल इनोवेशन अॅवॉर्डने सन्मानित केले.
या कार्यक्रमास डॉ. दीपक माळी (एमएससीईआरटी पुणे), डॉ. किरण धांडे (यशदा पुणे), पद्मश्री गिरीश प्रभुणे, जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू, प्रदीप मोरे (माजी शिक्षण उपसंचालक पुणे), दत्तात्रय वारे (प्रयोगशील शिक्षक), शिक्षणक्षेत्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, शासकीय अधिकारी, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते. ४ व ५ मार्च या दोन दिवसात शिक्षकांना शैक्षणिक मेजवानी सर फाउंडेशनच्यावतीने देण्यात आली. यात उपक्रमाचे सादरीकरण, व्याख्याने परिसंवाद घेण्यात आले. देशभरातून महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश, हैदराबाद, गुजरात अशा विविध राज्यातून नवोपक्रमशील शिक्षकांनी आपल्या उपक्रमाचे सादरीकरण केले. यात नाचणकर यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे आनंददायी शिक्षण या उपक्रमाचे सादरीकरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध बाबींचे सहजरित्या आकलन होण्यासाठी डिजिटलच्या माध्यमातून विविध बाबी विकसित केल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमास मान्यवरांच्या हस्ते नॅशनल एज्युकेशनल इनोव्हेशन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

--

खेर्डी मोहल्ला व शिगवणवाडीत विकासकामांचे भूमिपूजन

चिपळूण ः आमदार शेखर निकम यांच्या आमदार फंडातून खेर्डी मोहल्ला व शिगवणवाडी येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या विकासकामांमध्ये रवींद्र बुरटे घर ते शौकत चौगुले घर बंदिस्त गटार पाखाडी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर यांच्या प्रयत्नातून श्रीकांत बुरटे घरालगत संरक्षक भिंत बांधणे व बशिर चौगुले घराजवळ गटार बांधणे आदी कामांचा समावेश आहे. या सोहळ्याला माजी उपसरपंच प्रकाश साळवी, उपसरपंच विनोद भुरण, सुनील मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरडकर, राकेश दाभोळकर, राजेश सुतार, प्रणाली दाभोळकर, रशिदा चौगुले, ओवी शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

--

चिपळूण पालिकेतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम

चिपळूण ः जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथील पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ९ मार्चला महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शहरातील (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकूल येथे होणार आहेत.
चिपळूण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागप्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ९ मार्चला सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन, दीपप्रज्वलन, स्वागत समारंभ, आरोग्य विभागातील महिलांचा सत्कार, ८ मार्च जागतिक महिलादिनाबाबत इच्छुकांची मनोगते, आरोग्यासंदर्भात चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत संगीत खुर्ची, लिंबू चमचा, मेणबत्ती पेटवणे, बादलीत बॉल टाकणे, डोळे बांधून हत्तीला शेपूट काढणे, फुगे फुगवणे, स्ट्रॉ गेम, चिठठ्या गेम, पाय बांधून पुढे जाणे, रेस जोडी जोडी, उखाणे आदी स्पर्धा होणार आहेत. यातील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन साडविलकर यांनी केले आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com