रत्नागिरी- भैरीची पालखी आली मिरवत

रत्नागिरी- भैरीची पालखी आली मिरवत

rat७p४५.jpg-KOP२३L८७४७६ रत्नागिरी ः ग्रामदैवत श्री भैरीची पालखी मंदिरातून होळी तोडण्यासाठी आणि गावची ख्यालीखुशाली घेण्यासाठी निघाली. त्या वेळी सडा-जाकिमिऱ्यातील नवलाई-पावणाई पालखी भेट पालख्यांची भेट झाली.

श्री भैरीदेवाची पालखी आली मिरवत रे होलिSSओ..

रत्नागिरी, ता. ७ ः बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी शिमगोत्सवानिमित्त काल (ता. ६) मध्यरात्री १२ वा. मंदिराबाहेर आली आणि भैरीबावाची पालखी आली मिरवत रे होलिओ......चा गजर झाला. गाऱ्हाणे होऊन पालखी बाहेर आल्यावर प्रांगणात मिऱ्यातील पालख्या भेटीचा सोहळा रंगला. नंतर पालखी मार्गक्रमण करत जोगेश्वरीचा शेंडा उभा करण्यास रवाना झाली. हा सोहळा पाहण्यासाठी किमान ८ हजार भाविक परिसरात उपस्थित होते.
श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे बारा वाड्यांतील गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी यांना सोबत घेऊन शिमगोत्सवाचे नियोजन केले आहे. उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरा होत आहे. मध्यरात्री १२ वा. श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिराबाहेर पडली.
श्री देव भैरी बारा वाड्यांचा रखवालदार असल्याने लाखो भाविक श्री भैरीच्या चरणी नतमस्तक होत आहेत. भैरी मंदिरात काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी, टेंभ्ये येथील भैरी-जुगाई या पालख्या भैरीला भेटून गेल्या तर काल पौर्णिमेला सडामिर्‍या येथील नवलादेवी-पावणादेवी व जाकिमिर्‍यातील नवलाई, पावणाई या दोन्ही देवी भैरीबुवाच्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. ढोलताशांच्या गजरात, वाजतगाजत व भैरीचा जयघोष करत या पालख्या मंदिरात आल्या. विधीवत या पालख्यांची पूजा करण्यात आली. या वेळी भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. ढोलताशांचा गजर, हुर्रा रे हुर्रा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा ऽऽ रे होलिओऽऽ ही फाक दुमदुमली.
भैरीची पालखी जोगेश्‍वरीची होळी तोडण्यासाठी गेली. खालची आळी, (कै.) बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात पोहोचली. झाडगाव सहाणेवरून टिळक आळी, मुरलीधर मंदिर, बंदररोड, मांडवी, घुडे वठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार येथे नेण्यात आली. गोडीबाव तळ्यावरून तेलीआळी, रामनाका, राममंदिर, राधाकृष्ण नाका, गोखलेनाका, गाडीतळ, शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलशेजारी नरेंद्र सांवत यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी गेली. तेथून होळीचा शेंडा घेऊन झाडगाव येथे सहाणेवर जाऊन संध्याकाळी होळी उभी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com