निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

८७४९८

राज्य कर्मचारी संघटनेचे संघटक
विठ्ठला महाकाळ यांचे निधन
रत्नागिरी ः आगरनरळ गावचे सुपुत्र आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे संघटक विठ्ठला महाकाळ (वय ७७) यांचे ४ मार्चला रत्नागिरीतील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. कृषी विभागातून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी इतरही विविध क्षेत्रांत कार्य केले आणि त्यातून अनेक संस्था निर्माण झाल्या. कला, नाट्य, साहित्य तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे बहुमोल योगदान होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. विठ्ठला महाकाळ यांनी ‘कर्मचारी मित्र’ या मासिकासाठी कार्यकारी संपादक म्हणून अनेक वर्षे काम केले. अखिल महाराष्ट्र भोई समाजसेवा संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद त्यांनी बराच काळ भूषवले होते. जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाला एकत्रित आण्यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्हा एनटी वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली. बजरंग कला निकेतन कलामंचाची स्थापना करून आगरनरळ गावामध्ये सांस्कृतिक माध्यम उभे केले. त्या माध्यमातून गावाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना दिली. नाट्य, कला, साहित्यक्षेत्रातही ते कार्यरत होते. श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा संकल्प त्यांनी केला होता आणि त्या संकल्पाची पूर्ती झाली म्हणून त्यांचे पार्थिव त्या मंदिराच्या ठिकाणी नेऊन तसेच त्यांनी स्वतः लिहिलेल्या नांदीचे गायन करून त्यांना आदरांजली वाहिली.

८७३१७
प्रमोद साने यांचे निधन
साडवली ः देवरूख येथील मधली आळीतील प्रमोद साने (वय ६९) यांचे शनिवारी (ता. ४) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
परोपकारी वृत्ती, सदैव मदतीला धावून जाणे या स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. हरी पाडुंरंग गद्रे पेढीचे ते कामकाज पाहात होते.
अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात रविवारी सकाळी प्रमोद साने यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.