
फसवणूक
rat०७२१.TXT
बातमी क्र.. २१ (पान ३ साठी)
चिपळुणातील हॉटेल चालकाला ७२ हजाराचा गंडा
चिपळूण, ता. ७ ः येथील हॉटेलमध्ये ११ दिवस डीलक्स रूम घेऊन व खाण्याचा मनमुराद आस्वाद घेऊन हॉटेलचे झालेले ७२ हजार रुपये बिल न भरताच पंजाब येथील दोनजणांनी हॉटेल चालकाला गंडा घातला आहे.
याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंजाबमधील रंजित सिंग व रूपल सिंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दोन्ही संशयित ९ ते २० फेब्रुवारी या कालावधीत येथील अयोध्या हॉटेलमध्ये डीलक्स रूम घेतली व त्यांनी वास्तव्य केले. वेळोवेळी जेवण, नाश्ता केला त्यामुळे त्यांच्या बिलाची रक्कम ७२ हजार रुपये झाली होती. रूम सोडतेवेळी आरोपींनी हॉटेलचे मॅनेजर शिंदे यांना सांगितले की, आपले वडील न्युझिलंड येथे असतात ते ऑस्ट्रेलिया अँड न्युझिलंड बँकेच्या अकाउंटमधून हॉटेलचे मालक चित्तरंजन शेट्टी यांच्या अकाउंटला पैसे पाठवणार आहेत. तशी त्यांनी व्हॉट्सअॅपला खोटी पावती पाठवली व ते दोघे हॉटेल सोडून निघून गेले; मात्र प्रत्यक्षात असे कोणतेही पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संशयितांविरोधात लिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.