
राष्ट्रीय परिषदेसाठी निवड
rat०७५.txt
बातमी क्र. ५ (संक्षीप्त)
राष्ट्रीय परिषदेसाठी देवरूख
नगराध्यक्षा मृणाल शेटयेंची निवड
रत्नागिरी ः विज्ञानभवन, नवी दिल्ली येथे १० व ११ मार्चला राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी (NPDRR) परिषद होणार आहे. यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ULB) दहा अध्यक्षांचे नामांकन भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. त्यात देशातील दहा राज्यांमधील प्रत्येकी एक अशा दहा नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून देवरूख नगरपंचायत नगराध्यक्षा मृणाल अभिजित शेटये यांची निवड झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आहेत. या परिषदेचे पहिले सत्र २०१३ ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत पार पडले होते, तर दुसरे सत्र २०१७ ला तत्कालीन गृहराज्यमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले होते. नैसर्गिक आपत्तीमधून होणारी हानी कमीत कमी व्हावी याकरिता येणाऱ्या काळात अनेक उपाययोजना शासन स्तरावरून केल्या जात आहेत. त्याबाबतचे नियोजन व त्याचा प्रचार प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावा या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
--
साडवली बसथांबा फलकाचे बनेंच्या हस्ते उद्घाटन
देवरूख ः देवरूख जवळील साडवली येथील बस थांबा फलकाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुभाष बने यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ७) करण्यात आले. हा फलक ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख वैभव जाधव (साडवली) यांच्या सौजन्याने करण्यात आला आहे. या उद्घाटनप्रसंगी साडवलीचे सरपंच राजेश जाधव, ठाकरे गटाचे देवरूखचे नगरसवेक वैभव पवार, उपशाखाप्रमुख वैभव जाधव, उपविभाग प्रमुख अमोल जाधव, राजाराम मोहिरे गुरुजी, पंढरी जाधव, अजित मोहिरे, रूपेश जाधव, तुषार शिंदे, मयुरेश भोपळकर, अभिषेक दळवी, नीलेश मोहिरे, संदीप पवार, संजू जाधव, संजय माने व ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.
--
ओळी
- rat७p४८.jpg ः
८७४९६
आसावरी शेटे
- rat७p४९.jpg ः
८७४९७
बिना कळंबटे
शेटे, कळंबटे, गांगण यांना
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
रत्नागिरी ः राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात विभागस्तरावर सहेली ग्रुप चिपळूण तर जिल्हास्तरावर रत्नागिरीतील प्राध्यापिका बिना कळंबटे, समाजसेविका सुरेखा गांगण चांदेराई व समाजसेविका आसावरी शेटे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापिका बिना कळंबटे, आसावरी शेटे, सुरेखा गांगण या सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी धावून जातात. शासनाच्या विविध योजना समाजातील गरीब व गरजू महिलांना मिळाव्यात यासाठी समाजसेविकांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या या कामाची दखल राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम १० हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे स्वरूप आहे.
--
- rat७p५३.jpg-
८७५१५
खे़ड ः तालुक्यातील मोरवणे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजीत पाककला स्पर्धेत तयार केलेले पदार्थ.
मोरवणेत पाककला स्पर्धेचे आयोजन
खे़ड ः तालुक्यातील मोरवणे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नाचणी, वरी, बाजरी, ज्वारी या पिकांपासून पदार्थ बनवणे हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेला २३ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांनी थालीपीठ, शंकरपाळी, केक, मोदक, हराभरा, बिस्कीट, खीर, इडली, भाकरी, आप्पे आदी पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी शाहू पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भरड धान्याच्या पाककला प्रात्यक्षिक मालप यांनी करून दाखवले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक संतोष भोसले, मोरवणे गावच्या सरपंच संचिता जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मोरे, श्रुष्टी शिंदे, आत्मा समितीचे सदस्य सुरेंद्र शिंदे व कृषी सहाय्यक जे. के. काते, कविता चव्हाण, वसीम मुकादम व शेतकरी महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास पैठणी, द्वितीय क्रमांकास साडी, तृतीय क्रमांकास साडी व सर्व स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही पारितोषिके प्रभात योग्यता विकास केंद्र, लोटे यांच्याकडून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यिका रेश्मा दडस यांनी केले.
----