
कंरजेश्वरीने शोधली 22 शेरणे
rat०७४२.txt
बातमी क्र. ४२ (पान ३ किंवा ५ साठी)
फोटो
- ratchl७५.jpg ः
८७४१७
चिपळूण ः शेरणे कार्यक्रमास झालेली भाविकांची गर्दी.
- ratchl७६.jpg
८७४१८
ः शोधलेली शेरणे भाविकांना दाखवताना.
- ratchl७७.jpg ः
८७४१९
शेरणेंच्या शोधात निघालेली पालखी.
कंरजेश्वरीने शोधली २२ शेरणे
शिमगोत्सव उत्साहात ः भाविकांची प्रचंड गर्दी
चिपळूण, ता. ८ ः शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव उत्साहात सुरू आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी पेठमाप येथे प्रसिद्ध शेरणे काढण्याचा कार्यक्रम झाला. १२९ पैकी २२ शेरणे करंजेश्वरीने शोधले. या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संपूर्ण महाराष्ट्रात श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे करंजेश्वरीचा हा उत्सव गुलालमुक्त साजरा केला जातो. गेल्या तीन दिवसापासून शिमागोत्सवाला सुरवात झाली आहे. रविवारी पालखी पेठमाप येथे आली. सोमवारी दुपारनंतर पेठमाप येथे शेरणे काढण्याच्या कार्यक्रमास उत्साहात सुरवात झाली. या निमित्ताने वाशिष्ठी नदीकिनारी मोठी जत्रा भरली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत करंजेश्वरीने २२ शेरणे शोधली. जेव्हा शेरणे शोधली जायची तेव्हा भाविक जल्लोष करायचे. ढोलताशांच्या गजरात सारा परिसर भक्तीमय झाला होता. नदीकिनारी असलेल्या विस्तीर्ण परिसरात जमिनीत शेरणे पुरता यावीत तसेच भाविकांना तेथे जमता यावे यासाठी येथील जागेत काहीसा भराव करण्यात आला होता. नदीपात्रात पाणीपातळी कमी असल्याने कोणतीही अडचण आली नाही. यात्रेच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स, चिमुकल्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, पाळणे आणि देखावे उभारण्यात आले होते. शेरणे कार्यक्रमाच्या आठवणी राहण्यासाठी अनेकजण गर्दीचा माहोल मोबाईलमध्ये टिपण्यात दंग झाले होते तर महिला आणि तरुण-तरुणीही सेल्फी काढून आनंद घेत होत्या. अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती. शेरणे कार्यक्रमानंतर सायंकाळी उशिरा श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीची पालखी गोवळकोटकडे रवाना झाल्या.
वर्षभराने सापडले शेरणे
पुण्यातील एका भाविकाने गतवर्षी श्री देवी करंजेश्वरीला नवस करून शेरणे पुरले होते; परंतु गतवर्षी शेरणे सापडले नाही. यावर्षीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते शेरणे जसेच्या तसे सापडून आले. याबद्दल भाविकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.