महिला दिन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन विशेष
महिला दिन विशेष

महिला दिन विशेष

sakal_logo
By

rat०७४५.txt

बातमी क्र.. ४५ (पान ३ साठी अॅंकर)

rat७p४३.jpg-
८७५७८
रत्नागिरी ः महिलादिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सुरेखा पाथरे. डावीकडून सुनीता गोळपकर, विजया मेस्त्री, रेणुका पड्याळ, प्रीती पटेल, सारा नाईक.

लोगो........ महिला दिन विशेष

आम्ही खऱ्या स्वतंत्र, स्वाभिमानी!

दिव्यांग महिलांच्या जिद्दीच्या कहाण्या ; आस्थाचा कार्यक्रम

मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः घरात सर्व कामे करणाऱ्या महिलेचा अंधत्वामुळे घटस्फोट झाला, दुसऱ्या महिलेचा अपघातात हात काढावा लागला; पण पती व सासूने धीर दिल्याने आजही दिव्यांगत्वावर मात करून कार्यरत महिला आणि एक अंध महिला गॅस एजन्सी चालवते, गाण्याचे कार्यक्रम करते. या सर्व महिला आपल्या दिव्यांगत्वावर मात करून मार्गक्रमण करत आहेत.
कासारवेलीतील अंध सुनीता गोळपकर या शिवणकाम, शेतीकाम व घरकाम करतात. अंधत्व असल्याने लग्नानंतर पतीने नाकारले व घटस्फोट झाला. माया, ममता मिळाली नाही. पण त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आतेभावांची मदत व आता घरघंटी घेतली आहे. काजुर्ली, गुहागरमधील विजया मेस्त्री या अंध असूनही त्या ८ वर्षांपासून एचपी कंपनीची चंद्रभागा गॅस एजन्सी चालवतात. त्या संगीत मैफली करतात. त्या म्हणाल्या, जाते तिथे अंधत्वाचे प्रदर्शन होत आहे; पण शासनाने दखल घेऊन मदत केली पाहिजे. महिलांनी अबला नव्हे सबला झाले पाहिजे. दिव्यांग खडतर जीवन जगत आहेत. शासनाची पेन्शन अपुरी आहे.
कर्ला येथील रेणुका पड्याळ म्हणाल्या, २०११ मध्ये माझा एक हात काढावा लागला. पती व सासुबाईंच्या मदत, प्रोत्साहनामुळेच मी खचले नाही; पण संसाराला साथ करत आहे. सोसायट्यांमध्ये झाडलोट काम करते. शिमगोत्सवानिमित्त पुरणपोळ्याही केल्या, हे सर्व सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
लांज्यातील सारा नाईक व समरीन नाईक या सेरेब्रल पाल्सीग्रस्त दोन्ही भगिनी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची आई पोषण आहार शिजवतात. दहा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले आहे. आता आस्थाच्या मदतीने दोघींचेही युनिक आयडी कार्ड, रेशनकार्ड काढले आहे. अलिकडेच त्यांच्या नावावर सातबारासुद्धा करण्यात यश आले आहे. या वेळी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी सांगितले, मी पोलिओग्रस्त असले तरी २००७ पासून रत्नागिरीत नोकरी करत आहे. पती दिव्यांग असून आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच चांगले शिक्षण घेऊ शकले व नोकरी मिळवू शकल्याचा अभिमान वाटतो.
महिला आणि अपंगत्व ही कल्पना घेऊन आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांच्या संकल्पनेतून अनोखा कार्यक्रम आयोजित केला. त्याद्वारे दिव्यांग मुलांसाठी पाळणाघर असावे, फक्त प्रश्न नकोत तर उत्तर शोधूया असे ठरवण्यात आले. या एकल दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी कमिटी गठीत करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आस्थाच्या प्रमुख सुरेखा पाथरे यांनी दिली.
---