शिरोड्यातील नुकसानग्रस्तांना मदत

शिरोड्यातील नुकसानग्रस्तांना मदत

टीपः swt७३२.jpg मध्ये फोटो आहे.
शिरोडा : येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना रोख १ लाखाची आर्थिक मदत संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करताना प्रसन्ना देसाई. शेजारी सुहास गवंडळकर आदी.

शिरोड्यातील नुकसानग्रस्तांना मदत

भाजपकडून १ लाख; व्यापारी संघटनेकडे सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ ः शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी या ठिकाणी भेट देऊन ही मदत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केली.
शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष तेली शिरोडा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार तेली यांनी आपला शब्द पूर्ण करत १ लाखांची मदत सुपूर्द केली. यावेळी शिरोडा व्यापारी संघटनेचे सेक्रेटरी जयवंत राय, आगीत नुकसान झालेले व्यापारी सुशील नाटेकर, अजित आरोदेंकर, साईश नाटेकर, डॉ. प्रसाद साळगावकर, सुमित चव्हाण, विशाल गावडे, भाजप तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, लक्ष्मीकांत कर्पे, मच्छीमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा केळूस्कर, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, मनोज उगवेकर, भाजप शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर, अर्चना नाईक, हेतल गावडे, शिरोडा शहराध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, ज्येष्ठ पदाधिकारी बबन आडारकर, बाळकृष्ण परब, चंद्रशेखर गोडकर, हरिश्चंद्र परब, अनिल गावडे, तालुका महिला पदाधिकारी गंधाली करमळकर, शहर पदाधिकारी जितेंद्र आजगावकर, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आरवली पदाधिकारी एकनाथ साळगावकर, भाजप हिंतचिंतक नाना नाटेकर, व्यापारी सिध्देश नाटेकर, विनित नाटेकर, समीर आरोस्कर, किरण कामत उपस्थित आदी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com