आलिशान मोटारीतून दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आलिशान मोटारीतून दारू जप्त
आलिशान मोटारीतून दारू जप्त

आलिशान मोटारीतून दारू जप्त

sakal_logo
By

87551
आंबोली ः येथे जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस.

आलिशान मोटारीतून दारू जप्त

आंबोलीत कारवाई; बेळगावजवळील एकावर गुन्हा

सावंतवाडी, ता. ७ ः आलिशान मोटारीतून कर्नाटक-बेळगाव अथणी येथे होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर आंबोली पोलिसांनी कारवाई करीत सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय ३६, रा. अथणी बेळगाव) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे याच्या मार्गदर्शनाखाली सध्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई सुरू आहे. आंबोली पोलिस दूरक्षेत्र येथे वाहनाची तपासणी करण्यात येत असताना आज सकाळी कर्नाटक पासिंगचीं आलिशान मोटार सावंतवाडीहुन बेळगावच्या दिशेने वाहतूक करीत होती. तिला थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी अवैध गोवा बनावटीची दारूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आतील दारूचा मुद्देमाल तपासला असता त्यात जवळपास सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. महाराष्ट्रातून सध्या छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारूची वाहतूक होत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख रुपयांची मोटारही जप्त करण्यात आली. अवैध दारू वाहतूक प्रकरणी कलमेश मुलाबट्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेडकॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांच्या पथकाने आंबोली तपासणी नाक्यावर केली.