Tue, May 30, 2023

मुणगेत आज विविध कार्यक्रम
मुणगेत आज विविध कार्यक्रम
Published on : 7 March 2023, 2:52 am
मुणगेत आज विविध कार्यक्रम
मुणगे, ता. ७ ः येथील भगवती हायस्कूलच्या वतीने उद्या (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी दहाला जागतिक महिला दिन कार्यक्रम होणार असून त्यानिमित्त भगवती हायस्कूलमध्ये हायस्कूलच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या व महिला पालकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सहभोजन, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, पाककला स्पर्धा, फनी गेम्स व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज आणि शिक्षकांनी केले आहे.