सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम
सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम

सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम

sakal_logo
By

87575
खांबाळे ः जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून, मंगळवारी गावोगावी देव मांडावर गेले. त्यानिमित्त येथे उत्साहात काढण्यात आलेली मिरवणूक.


सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम
गावोगावी चैतन्य; हजारो चाकरमानी दाखल
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः जिल्ह्यात शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. त्यासाठी हजारो चाकरमानी दाखल झाले आहेत. पुढचे काही दिवस गावोगाव विविध प्रथा परंपरांसह साजऱ्‍या होणाऱ्‍या उत्सवानिमित्ताने सर्वत्र चैतन्य पसरले आहे.
जिल्ह्यात सोमवारी गावोगावी होळीची स्थापना झाली. प्रत्येक गावाची शिमगोत्सवाची प्रथा परंपरा वेगवेगळी आहे. उत्सव साजरा करण्याचे दिवसही अगदी पंधरा दिवसांपर्यंत असतात. यानिमित्तच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. जिल्ह्यात ११७१ ठिकाणी होळीची स्थापना करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात होळीच्या दिवशी आंब्याचे झाड पुरून त्याचे पूजन करण्यात आले. त्याभोवती समिधा म्हणून काही ठिकाणी गवत, तर काही ठिकाणी लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात आली. त्यानंतर पेटलेल्या होळीभोवती ‘बोंब’ मारत लोकांनी प्रदक्षिणा घातली. होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. पाच, सात, नऊ, पंधरा आदी दिवस चालणाऱ्‍या उत्सवानिमित्त गावागावातील रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषांतील नाचगाणी, खेळ याला आजपासून प्रारंभ झाला.
उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे रंगत वाढली आहे. काही गावांत मानापमानावरून वाद असल्याने अशा गावांत पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्व काळजी घेतली आहे.