रखडलेल्या प्रश्नांबाबत मुंबईत कोकणकरांचा शनिवारी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेल्या प्रश्नांबाबत मुंबईत
कोकणकरांचा शनिवारी मेळावा
रखडलेल्या प्रश्नांबाबत मुंबईत कोकणकरांचा शनिवारी मेळावा

रखडलेल्या प्रश्नांबाबत मुंबईत कोकणकरांचा शनिवारी मेळावा

sakal_logo
By

रखडलेल्या प्रश्नांबाबत मुंबईत
कोकणकरांचा शनिवारी मेळावा
कणकवली, ता. ८ ः रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग, रिफायनरी सारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न, तसेच कोकणच्या विकासाची दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचला जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समितीतर्फे कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा मेळावा होणार आहे.
मुंबई - गोवा रस्त्याचे काम गेली दहा वर्षे रखडले आहे. रखडलेल्या तसेच तांत्रिकदृष्ट्या त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे - कोल्हापूर मार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पुन्हा एकदा राजापूर येथे पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा विषय चर्चेत आला आहे. प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधातील लढा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकणातून त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न कोकण जन विकास समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोकणातील कातळाच्या सड्यांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर, जगदीश नलावडे, संजय परब, केतन कदम तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, प्रकाश लवेकर आदींनी केले आहे.