सानेवर खेळ्यांकडून ग्रामदेवतेची आराधना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानेवर खेळ्यांकडून ग्रामदेवतेची आराधना
सानेवर खेळ्यांकडून ग्रामदेवतेची आराधना

सानेवर खेळ्यांकडून ग्रामदेवतेची आराधना

sakal_logo
By

rat०८११.txt

बातमी क्र.. ११ (टुडे ३ साठी, मेन)

- rat८p२.jpg-
87667
पाले ः ग्रामदेवता मंदिरासमोर पेटवण्यात आलेला होम

- rat८p३.jpg-
87668
पाले ः भक्तीपूर्ण वातावरणात सांस्कृतिक वारसा जपणारे पालेगावचे खेळी.

लोककलेच्या सादरीकरणातून ग्रामदेवतेची आराधना

पालेगावचा शिमगोत्सव; संस्कृती, परंपरेची जपवणूक; कर्तबगार गावकऱ्यांना आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः तालुक्यातील पाले येथील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव. या निमित्ताने ग्रामदेवता मंदिरासमोरील चारही वाड्या एकत्रित येत पेटवण्यात येणारा होम आणि सहाणेवर सादर होणारा लोककला तमाशा आकर्षणाचा केंद्रबिंदू. सहाणेवर तमाशा या लोककलेच्या सादरीकरणातून खेळ्यांनी ग्रामदेवतेची आराधना केली. तसेच विविध गीतांमधून समाजप्रबोधन करताना पौराणिक कथांवर गायनातून भाष्य केले.
परंपरेनुसार पाले गावाची ग्रामदेवता चालकोबा, खामराजा, जननी देवीचा शिमगोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा आणि श्रद्धाभाव जपत ग्रामस्थ सहाणेवर आले. ग्रामदेवतेची आराधना, जयजयकार करत रंगलेला हा शिमगोत्सव दरवर्षीप्रमाणे परंपरा जोपासत पार पडला. ग्रामदेवता चालकोबा, खामरजा देवाच्या मंदिरात गावातील चारही वाडीतील ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर मंदिराच्या लगत असणाऱ्या सहाणेवर देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावाच्या वेशीवर असणारी जननीदेवी मंदिरात सर्व ग्रामस्थ व खेळी तिला आणण्यासाठी रवाना झाले. जनाईदेवीच्या आगमनानंतर सर्व देवतांची यथोचित पूजा करण्यात आली. पुजारी यांच्या हस्ते गावातील लोकांनी आणलेले नारळ अर्पण करण्यात आले. शिमगोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण खेळे ही कलावंतांनी पिढ्यांपिढ्यांकडून आलेली सांस्कृतिक ठेव तितक्याच आपुलकी, श्रद्धेने जपली आहे. स्त्री वेशात नटूनथटून येणारे कलावंत त्यांचा वैशिष्ट्येपूर्ण ठेक्यातील नाच या साऱ्यांनी रंगत भरली. या वेळी वरची आळी, खालची आळी व कोंडवाडी यांनी आपली कला सादर केली. गावातील निधन झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चार तासांच्या भक्तीपूर्ण सोहळ्यानंतर सायंकाळी ६ वा. जयघोष करत ग्रामदेवतांना भक्तीभावात पुन्हा मंदिरात स्थानापन्न करण्यात आले.


...झाली रंगभूमी, अंगणवाडी अनाथ

या वर्षात गावातील शाहीर व ढोलकीपटू पांडुरंग पोस्टुरे व अंगणवाडी मदतनीस सुरेखाबाई माळी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शाहीर गणेश माळी व पालेकोंड कलापथकाने काव्य आदरांजली सादर केली. रसिकांची सेवा करणाऱ्या पोस्टुरे व गावातील बालकांना मायममतेने सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका सुरेखा माळी यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने गावाची रंगभूमी आणि अंगणवाडी अनाथ झाल्याच्या भावना काव्यातून व्यक्त करण्यात आल्या.