बदलत्या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत

बदलत्या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत

rat०८१०.txt

बातमी क्र.. १० (टुडे पान १ साठी)

फोटो ओळी
-rat८p१.jpg-
87622
हर्णै ः वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या पीएचडी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार संजय जगताप.
-----
बदलत्या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करा

आमदार संजय जगताप ः बेलोसे महाविद्यालयात पीएचडी सेंटरचे उदघाटन

हर्णै, ता. ८ ः भारतीय प्रतिभा सर्वदूर पोहोचली आहे आणि जगातील प्रत्येक देशात लिटिल इंडिया तयार होत आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे हा बदल शिक्षणक्षेत्रातील सर्वांना स्वीकारावा लागेल व बदलत्या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करावे लागतील, असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.
दापोली येथील बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी आमदार जगताप यांची नियुक्ती झाली आहे. आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली या संस्थेच्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयामध्ये ''पीएचडी सेंटर'' व ''इंदुताई लक्ष्मण यादव माहिती तंत्रज्ञान'' अभ्यासक्रमाच्या इमारत उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. ते म्हणाले, कोकणातील विविध क्षेत्रातील विद्वत्तांनी नेहमीच आपणा सर्वांना आकर्षित केले आहे. हा वारसा संवर्धित होण्यासाठी व चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी महाविद्यालयात पुरेशा सुविधा असणे आवश्यक आहेत. शिक्षण ही समाजाची गरज म्हणून संस्था चालवण्याचे दिवस गेले. शैक्षणिक संस्थांना यापुढे सेवा प्रदाता म्हणून काम करावे लागणार आहे. शैक्षणिक धोरण बदलले असून सध्या डॉक्टर, इंजिनिअरचे शिक्षण सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. दापोलीमध्ये हॉटेल आणि पर्यटन, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, विविध कार्यकारी सेवा सहकारी प्रशिक्षण, बँक स्टाफ ट्रेनिंग, फ्रुट प्रोसेसिंग कोर्स, नर्सिंग कॉलेज, लॉ (LL.B.) कॉलेज यासारख्या अभ्यासक्रमांच्या संधी आहेत.
या वेळी संस्थेचे सभापती शिवाजी शिगवण यांनी आमदार जगताप यांचे कौतुक केले. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले यांचा विद्यावाचस्पती पदवी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, अनंत सणस, कासम महालदार, धनंजय यादव, दीपक हर्डीकर, सुनीता बेलोसे, प्रेमलता जैन, मीना रेडीज, सुनील पुळेकर, कुणाल शेवडे, राजाराम कदम, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com