आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च वाढणार
आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च वाढणार

आंबा बागायतदारांचा फवारणीचा खर्च वाढणार

sakal_logo
By

rat०८१२.TXT

बातमी क्र.. १२ (टुडे २ साठी)

आंबा बागायतदारांचा फवारणी खर्च वाढणार

ढगाळ वातावरणाचा फटका ; वेगवान वाऱ्‍यामुळे परिणाम

रत्नागिरी, ता. ८ ः गेले काही दिवस पारा ३९ अंशापर्यंत पोचला होता. त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा होता. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात काही भागांमध्ये मंगळवारी (ता. ७) सकाळी ढगाळ वातावरण होते. वेगवान वारेही वाहत होते. ढगाळ वातावरणामुळे हापूसवर किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशकांसह बुरशीनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.
होळी उभी राहिल्यानंतर पावसाचा शिडकावा होतो, अशी परंपरा सांगितली जाते. त्यानुसार यंदा शिमगोत्सवात पावसाळी वातावरण तयार झाले होते. पहाटेच्या सुमारास वेगवान वारेही सुटले होते. पाऊस पडणार अशीच स्थिती होती; मात्र कालांतराने कडकडीत ऊन पडले. ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबापिकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात मोहोरच आलेला नसल्याने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित हापूस उत्पादन मिळणार नाही. कडकडीत उन्हामुळे १५ मार्चनंतर फळ तयार होण्यास सुरवात होईल. गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी बाजारात हजार पेट्या रवाना होत आहेत. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे झाडावरील फळ वेगाने तयार होत आहेत. आजच्या ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च बागायदारांना होणार आहे. याबाबत रत्नागिरी तालुक्यातील आंबा बागायतदार राजेंद्र कदम म्हणाले, यंदा ज्या बागायतदारांनी कीटकनाशकांची योग्य फवारणी केली आहे त्यांच्याकडे आंबा चांगला राहील. पुढील आठ दिवसात पावसाची शक्यता असल्याने बागायतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे.