फेडरेशनकडून 32 हजार 916 क्विंटल भात खरेदी

फेडरेशनकडून 32 हजार 916 क्विंटल भात खरेदी

rat०८१४.TXT

बातमी क्र.. १४ (पान २ साठीमेन)

फेडरेशनकडून ३२ हजार ९१६ क्विंटल भात खरेदी

जिल्ह्यात १४ संकलन केंद्र ः उद्दिष्टापेक्षा अधिक प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भाताला शासनाकडून हमीभाव दिला जातो. भातखरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले; मात्र तरीही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. २६ हजार क्विंटल भातखरेदीचे उद्दिष्ट असताना ३२ हजार ९१६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदीसाठी जिल्ह्यात १४ संकलन केंद्र निश्चित करण्यात आली होती.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भात स्वत:ला ठेवून दोन पैसे मिळवण्यासाठी भात विक्री करता येते. शिरळ केंद्र वगळता अन्य केंद्रावर चांगली खरेदी झाली. जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांनी ३२ हजार ९१६ क्विंटल भाताची विक्री केली. भातविक्रीसाठी सुरवातीला ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सुरवातीला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली; परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे भात खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भात खरेदीनंतर त्याची भरडाई करून नंतर हा तांदूळ रास्त दर धान्य दुकानात विक्रीसाठी पाठवला जातो. त्यानुसार ऑनलाईन निविदा काढून नऊ हजार क्विंटल भाताची भरडाई करून घेण्यात आली आहे. भातविक्रीतून पैसे मिळवण्याची संधी उपलब्ध झाल्याने भातविक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांनी ३२ हजार ९१६ क्विंटल भातविक्री केल्याने विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच कोटी ९२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २०४० रुपये दर देण्यात आला. विक्रीनंतर लगेच पैसे मिळत असल्याने शेतकरी फायद्यात आहेत.
--
केंद्र*खरेदी (क्विंटल)
*खेड*८६७८
*गुहागर*१७०४.८०
*रत्नागिरी*३१६२.४०
*लांजा*१६७.६०
*केळशी*१८०१.२०
*राजापूर*१२५५.२०
*पाचल*१५७०.४०
*संगमेश्वर*३४१२.००
*दापोली*९०७.६०
*चिपळूण*४३६१.६०
*आकले*७५०
*मिरवणे*१९२४.४०
*शिरगांव*३२२०.८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com