
फोटोसंक्षिप्त-''ह्यो चेंडू दैवगतीचो''चे बांदा येथे प्रकाशन
फोटोसंक्षिप्त
८७७२१
‘ह्यो चेंडू दैवगतीचो’चे
बांदा येथे प्रकाशन
देवगड ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील प्रा. अविनाश विनायक बापट यांच्या ''ह्यो चेंडू दैवगतीचो'' या मालवणी कादंबरीचे प्रकाशन महिला दिनाचे औचित्य साधून बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयामध्ये झाले. प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रा. बापट यांची कादंबरी संपूर्ण मालवणी भाषेत आहे. विविध साहित्य प्रकारातील मिळून त्यांचे हे २४ वे पुस्तक आहे. यात मालवणी भाषेतील तीन कादंबऱ्या आणि तीन कविता संग्रहांचा समावेश आहे.
८७७२०
देवगडात ४१ जणांची
मोफत नेत्रचिकित्सा
देवगड ः येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा ४१ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आज सकाळी ९ ते १ या वेळेत शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीचे अध्यक्ष श्रीपाद पारकर, सचिव मनस्वी घारे, गौरव पारकर, कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद पाटील, संजय धुरी, रमाकांत आचरेकर, अनिल गांधी, महेश घारे आदी उपस्थित होते. शिबिर डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय येथे घेण्यात आले. शिबिराच्या प्रारंभावेळी तपासणीसाठी आलेल्यांचे प्रातिनिधिक स्वरुपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यामध्ये डॉ. अनिरुध्द तेली, दशरथ हाके, अनिकेत कावले, रेखा पाटकर यांचा समावेश होता.
--
‘नाते तुझे नि माझे’ स्पर्धा शनिवारी
सावंतवाडी ः येथील भोसले नॉलेज सिटीच्यावतीने महिलादिनानिमित्त ''''नाते तुझे नि माझे '''' स्पर्धेचे आयोजन शनिवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. यामध्ये आई व मुले यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचे सादरीकरण करावयाचे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या आई व मुलगा-मुलगी यांच्या जोडीने पाच मिनिटांच्या कालावधीत वेशभूषा, अभिनय, वक्तृत्व, गाणे किंवा नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून हे सादरीकरण करावयाचे आहे. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. ५ ते १० वर्षे वयोगटातील मुले व त्यांची आई यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.