आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व राखणार

आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व राखणार

rat०८१६.txt

बातमी क्र..१६ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat८p८.jpg ः
८७७५९
राजापूर ः मार्गदर्शन करताना आमदार राजन साळवी. या वेळी उपस्थित ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपळकर, विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड आदी
--
ठाकरे गटाचे वर्चस्व राखणार

राजन साळवी ः मुंबईत शिवसंवाद अभियानाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघाकडून मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शिवसवांद अभियानाला तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील गावसंघटकांसह शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंवाद अभियानात तालुक्यातील शिवसेना संघटना अधिक बळकट करताना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये वर्चस्व राखण्याचा निर्धार करण्यात आला.
मुंबई, प्रभादेवी येथे झालेल्या मेळाव्याला ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष पांडुरंग उपळकर, विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, मुंबई तालुकाप्रमुख बबन सकपाळ, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, युवासेना मुंबई समन्वयक अथर्व राजन साळवी, राजापूर तालुका युवधिकारी संदेश मिठारी, तालुका महिला संपर्कप्रमुख माधुरी मांजरेकर आदी उपस्थित होते.
सभेमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासह आगामी निवडणुकीमध्ये वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तालुका संपर्कप्रमुख भोवड यांनी गावसंघटकांनी आपापल्या गावाकडे लक्ष केंद्रित करून संघटनावाढीसाठी जोरदार प्रयत्न करावा. त्याद्वारे पक्षाचा प्रसार व प्रचार करण्याच्या सूचना भोवड यांनी पदाधिकाऱ्‍यांना दिल्या. या मेळाव्याचे औचित्य साधून तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय निवड झालेल्या गाव संघटकांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com