सरस्वती हायस्कूलमध्ये
विविध स्पर्धांना प्रतिसाद

सरस्वती हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

87726
नांदगाव ः महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेतील विजत्यांसह मान्यवर.

सरस्वती हायस्कूलमध्ये
विविध स्पर्धांना प्रतिसाद

नांदगावात जागतिक महिला दिन

नांदगाव, ता. ८ ः येथील सरस्वती हायस्कूलमध्ये जागतिक महिलादिन उत्साहात झाला. यानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत अफ्रोजा नावळेकर, संगीत खुर्ची स्पर्धेत अश्विनी बिडये यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नागेश मोरये, प्रा. उज्ज्वला खेडकर यांनी राजमाता जिजाऊ व प्रा. भाग्यश्री भोगटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. यावेळी सुभाष बिडये, बाळू म्हसकर, दाजी मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे, माजी सरपंच अफ्रोजा नावळेकर, शिक्षिका सौ. सावंत, श्रीम. नलावडे, श्री. नारकर, श्री. सावंत, श्री. खरोडे आदी उपस्थित होते.
पंचक्रोशी मर्यादित पाककला स्पर्धेत ४५ महिलांनी सहभाग घेतला. प्रशालेतील २० विद्यार्थिनी व चार विद्यार्थीही सहभागी झाले. यात अनुक्रमे अफ्रोजा नावळेकर, अश्विनी बिडीये, सीमा हडकर यांनी प्रथम तीन, तर योगिनी पाटील उत्तेजनार्थ बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. संगीत खुर्चीमध्ये अश्विनी बिडये, अफ्रोजा नावळेकर, सिमरन पाटणकर प्रथम तीन क्रमांक विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून तोंडवली कॉलेजचे प्रा. उज्ज्वला खेडकर, प्रा. भाग्यश्री भोगटे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सौ. सावंत, श्रीम. नलावडे, श्री. नारकर, श्रीकांत सावंत, विलास तांबे, श्री. खरोडे, श्री. कारेकर, श्री. पाटकर, श्री. मोहिते, श्री. पारधीये, प्रभाकर सोळंके, श्री. नादकर आणि श्री. यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी प्रास्ताविक केले. संजय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com