शिमगोत्सव निमित्ताने शिपोळे शाळेत खाद्यमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिमगोत्सव निमित्ताने शिपोळे शाळेत खाद्यमहोत्सव
शिमगोत्सव निमित्ताने शिपोळे शाळेत खाद्यमहोत्सव

शिमगोत्सव निमित्ताने शिपोळे शाळेत खाद्यमहोत्सव

sakal_logo
By

rat०८१९.txt

बातमी क्र..१९ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat८p१३.jpg ः
८७६५५
शिपोळे ः शाळेत खाद्य महोत्सवात पदार्थ बनवताना विद्यार्थी.
-------------
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बनवल्या पाककृती

शिपोळे शाळेत खाद्यमहोत्सव ; पदार्थांचे कौतुक

मंडणगड, ता. ९ ः तालुक्यातील शिपोळे शाळा नं. १ या शाळेत शिमगोत्सवानिमित्ताने खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते सातवीच्या २३ मुला-मुलींनी यात सहभाग घेऊन वेगवेगळ्या पाककृती तयार केल्या. पदवीधर शिक्षक पुंडलिक शिंदे यांची ही कल्पना उपशिक्षिका शशिकला चौधरी आणि अशोक जगताप यांनी प्रत्यक्षात आणली.
शाळेचे मुख्याध्यापक तथा उमरोली केंद्रप्रमुख शरद जगताप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी मुलामुलींची ५ गटात विभागणी करून प्रत्येक गटाला स्वराज्यातील एकेका किल्ल्याचे नाव देण्यात आले. त्यानुसार सिंहगड गटात कैवल्य पवार, निखिल जामकर, श्रेयस भागणे आणि अजय सावंत हे चार विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांनी बटाटाभजी-चटणी तयार केली. प्रतापगड गटातील कौशल पवार, ध्रुव साळवी, वेधान खोत आणि मकरंद मालप या विद्यार्थ्यांनी ऑम्लेट चपाती बनवली. रायगड गटातील प्रथमेश घोसाळकर, दर्शिल भागणे, श्रेयस गोठल आणि पियुष मोरे या विद्यार्थ्यांनी जवळा/कोलीम व चपाती बनवली. सुवर्णदुर्ग गटातील सहभागी विद्यार्थिनी पायल जगताप, समिरा कुळे आणि प्राची गायकवाड यांनी मुगाची उसळ आणि भाकरी बनवली होती. सिंधुदुर्ग गटातील श्रावणी शिंदे, भूमिका चौधरी, कशिश कुळे आणि पायल घोसाळकर या विद्यार्थिनींनी इडली-चटणी आणि सांबार बनवले होते.पियुष मोरे, मकरंद मालप यांचे अगदी गोलाकार चपात्या लाटणे आणि पायल जगताप हिचे तांदळाची भाकरी थापणे नजरेचे पारणे फेडणारे होते. तळणे, भाजणे, शिजवणे, वाफवणे, उकडणे, ठेचणे अशा पाककलेतल्या सर्व क्रिया साधल्या जात होत्या. आपापला पदार्थ तयार करून तो वाढताना कर्तव्यपूर्तीचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. सर्वांनी शिक्षकांसोबत एकत्र बसून शालेय पोषण आहारासोबत सहभोजन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रवीणा घोसाळकर, उपाध्यक्ष कैलास चौधरी, गाव अध्यक्ष काशिनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
--
सरपण ते तिखट जमवले
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आवश्यक ते सर्व साहित्य स्वेच्छेने जमा केले. अगदी चुलीसाठी विटा-दगड, सरपण ते तिखट मिठापर्यंत मुलांनी जमवाजमव केली.