कोल्हापूरच्या आंबेडकर फूटबॉल क्लबची बाजी

कोल्हापूरच्या आंबेडकर फूटबॉल क्लबची बाजी

rat८p१७.jpg
८७६५८
खेडः डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या मैदानावर फुटबॉलच्या रंगतदार लढतीत संघाचा बचाव करताना गोलरक्षक. (छाया ः यश साळवी, खेड )
------------
कोल्हापूरच्या आंबेडकर फुटबॉल क्लबची बाजी
डेरवण युथ गेम्सः अल्विया फर्नांडिस गोल्डन बूट’ची मानकरी
खेड, ता. ८ः डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलात सुरू असलेल्या ‘डेरवण युथ गेम्स २०२३’ मध्ये विविध क्रीडा प्रकारातील अटीतटीचे सामने रंगत आहेत. फूटबॉलमध्ये कोल्हापूरच्या मुलांच्या संघांनी वर्चस्व राखले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लबने बाजी मारली तर मुंबईच्या एफसी मुंबईकर या संघाने उपविजेतेपद पटकावले.
आंबेडकर क्लबने एफसी मुंबईकर संघाचा १-० ने पराभव केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सातारा येथील केएसडी शानभाग विद्यालयाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल संघाने उपविजेतेपद मिळवले. १४ वर्षांखालील गटात गोल्डन बुटाचा मान एफसी मुंबईकर या संघाच्या झॅक पिंटोने मिळवला तर १७ वर्षांखालील गटात एनएमसीएसच्या पृथ्वीराज थोरात गोल्डन बुटाचा मानकरी ठरला. दोन्ही गटांत मिळून ३२ संघ सहभागी झाले होते तर मुलींच्या गटात एकूण ७ संघांनी सहभाग नोंदवला होता. १४ वर्षांखालील मुलांच्या संघांमध्ये एफसी मुंबईकर संघाने संजिवनी पब्लिक स्कूलचा ४-१ने पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाने गडहिंग्लज युनायटेडचा २-१ने पराभव केला. १७ वर्षांखालील गटात एनएमईएसने दूधगंगा व्हॅलीचा ३-१ने पराभव केला. केएसडीएसव्हीने चिपळूण एफसीचा ५-४ने पराभव केला. मुलीच्या संघात गोल्डन बूट’ची मानकरी ठरली अल्विया फर्नांडिस तर फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात एस ३ सॉकर ब अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्ट क्रीडा संकुलातील फुटबॉल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात एस ३ सॉकर अकादमी संघाने अंतिम सामन्यात गोवा एफसी संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. सानिका भोसले हिने एकमेव गोल केला आणि हा गोल निर्णायक ठरला. पहिल्या उपांत्य सामन्यात एस ३ सॉकर अकादमी ब संघाने युनिव्हर्सल नॉलेज स्कूल संघाचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. या लढतीत सानिका भोसले, निदा सातारमेरकर, पूर्वा भोसले यांनी गोल नोंदवत सामना गाजवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गोवा एफसी संघाने एस ३ सॉकर अकादमी अ संघावर ३-० असा विजय मिळवला. या लढतीत अल्विया फर्नांडिस व सान्वी भोवर यांनी गोल नोंदवले. या स्पर्धेतील ‘गोल्डन बूट’ची मानकरी गोवा एफसी संघाची अल्विया फर्नांडिस ही ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com