
आरडीसीसीतर्फे घंटागाडी करीता वाहनकर्ज
rat०८३१.TXT
बातमी क्र. ३१ (पान ५ साठी)
फोटो ओळी
- rat८p३३.jpg-
८७७२३
रत्नागिरी ः मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मिरजोळे ग्रामपंचायतीला घंटागाडीची चावी प्रदान करताना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार. सोबत गजानन पाटील आणि अन्य.
---
आरडीसीसी देतेय घंटागाडीसाठी वाहनकर्ज
मिरजोळे ग्रामपंचायतीने घेतला लाभ ः इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा लाभ
रत्नागिरी, ता. ८ ः जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मिरजोळे ग्रामपंचायतीला घंटागाडी करीता वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या वाहनाची चावी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि बँकेचे संचालक गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कीर्तीकिरण पुजार यांनी बँकेचे व ग्राम पंचायत मिरजोळेचे कौतुक केले. या सारखा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत इतर ग्रामपंचायतीकरीताही राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी ही संकल्पना राबविली जाणार आहे. या घंटागाडीमुळे गावात स्वच्छते बदल जनजागृती होईल. यावेळी बॅकेचे संचालक श्री. पाटील यांनी मिरजोळे ग्रामपंचायतीप्रमाणे इतर ग्रामपंचायतीनीही घंटागाडी करीता कर्ज प्रस्ताव बँकेकडे सादर करावा असे आवाहन केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तत्काळ कर्ज उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी संदीप तांबेकर, जितेंद्र साळवी, एन. जी. जाधव, भिकाजी तावडे, विस्तार अधिकारी श्री. जाधव, मिरजोळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. गुरव, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी मिलिंद सांवत यांना स्वतःच्या वापराकरीता वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात आले.