खेड - पोसरे बुद्रुकच्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड - पोसरे बुद्रुकच्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा
खेड - पोसरे बुद्रुकच्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा

खेड - पोसरे बुद्रुकच्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा

sakal_logo
By

पोसरे बुद्रुक ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा
पाण्यासाठी भटकंती ; केळणेतील दोन वाड्याही तहानलेल्या
खेड, ता. ८ः तालुक्यातील पोसरे बुद्रुक-सडेवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी येथील प्रशासनाकडे ८ दिवसापूर्वी अर्ज दाखल करूनही अजूनही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पाठोपाठ केळणे येथील २ वाड्यांनाही टँकरची प्रतीक्षा आहे. या ठिकाणचे दाखले प्राप्त होताच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोसरे बुद्रुक सडेवाडीतील नळपाणी योजना दरड दुर्घटनेत उद्ध्वस्त झाल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. गतवर्षापासून सडेवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या ठिकाणचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने अद्यापही कुठलीच ठोस पावले न उचलल्यामुळे ग्रामस्थांची दाहीदिशा कायम आहे. यावर्षी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी आतापासूनच टाहो फोडावा लागत आहे. २४ फेब्रुवारीला टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, अद्यापही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी कासाविस झाले आहेत. टँकर सुरू करण्यासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही करत आहेत. सर्वेक्षण झाल्यानंतरच दाखला प्राप्त होताच टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे. या पाठोपाठ केळणे-भोसलेवाडी, मांगलेवाडी येथेही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरसाठी अर्ज दाखल केला आहे.